शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

प्रियकराच्या मदतीने सावत्र आईने केला मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:36 IST

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानेच मुलाचा सावत्र आई व तिच्या प्रियकराने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देअनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याचे निष्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानेच मुलाचा सावत्र आई व तिच्या प्रियकराने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोझर येथील कमलेश दमडू चव्हाण (३२) या विवाहिताच्या मृत्यूप्रकरणातील हे वास्तव आहे. आई व प्रियकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

कमलेश चव्हाण याचा मृतदेह ४ ऑगस्ट रोजी सकाळी मोझर येथील स्मशानभूमीत आढळून आला. सर्वांगावर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र हे कृत्य कुणी केले असावे याचा शोध लागला नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, नेरचे ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील निराळे, गजानन पत्रे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सचिन पवार यांनी या प्रकरणाचा कसून शोध घेतला. यात कमलेशची आई व तिच्या प्रियकरानेच खून केल्याचे स्पष्ट झाले.

सावत्र आई शोभा दमडू चव्हाण (५०) व तिचा प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (४२) या दोघातील संबंध कमलेशला पटत नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात वाद होत होता. ३ ऑगस्टच्या रात्री कमलेशला घरातच अर्धमेले केले. नरेंद्र ढेंगाळे याने त्याला उचलून स्मशानभूमीत आणले. याठिकाणी त्याच्यावर चाकूने वार केले. दारूच्या फुटलेल्यी शिशीनेही त्याला भोसकले. सदर दोघांनी पोलिसांपुढे हा सर्व घटनाक्रम उलगडला. या प्रकरणाच्या तपासात ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील निराळे, राऊत, कासम निंसुरीवाले, रोशन गुजर, अनिल डोकडे, योगेश सलामे, राजेश चौधरी, राजेश भगत, सचिन डहाके, ऋषिकेश इंगळे, किरण पडघम, सचिन तंबाके, नीलेश तिडके, एलसीबीचे पोलीस निरिक्षक सचिन पवार, विशाल भगत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.पहारेकऱ्यामुळे गूढ उकललेकमलेशची आई व तिचा प्रियकर हे दोघेच घरात होते. बाहेरून कुणी आल्यास माहिती मिळावी यासाठी त्यांनी घराबाहेर पंकज कावरे नामक व्यक्तीला पहारेकरी म्हणून ठेवले होते. झालेल्या सर्व प्रकाराचा तो साक्षीदार होता. सहा दिवसानंतर हे सर्व प्रकरण पोलिसांच्या प्रयत्नानंतर पुढे आले.

टॅग्स :Murderखून