शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अल्फाबेटीकल यादीत अडली बोंडअळीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:34 IST

पेरणीचे दिवस असतानाही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या रकमेसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीची मदत जाहीर झालेली असताना केवळ अल्फाबेटीकलमुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यात विलंब होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे अडचणी : जोडमोहा बँकेत शेतकºयांच्या येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : पेरणीचे दिवस असतानाही शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या रकमेसाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बोंडअळीची मदत जाहीर झालेली असताना केवळ अल्फाबेटीकलमुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यात विलंब होत आहे. नंबर लागला का हे पाहण्यासाठी मदतीस पात्र शेतकऱ्यांना येरझारा माराव्या लागत आहे.यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जोडमोहा शाखेंतर्गत ५५ गावांचा समावेश होतो. या बँकेला बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या याद्या सादर झाल्या आहे. मात्र रकमेचे वाटप झालेले नाही. ही रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना खरिपाच्यादृष्टीने मोठी मदत होणार आहे. मदतीसाठीच्या याद्या अल्फाबेटीकल तयार करून मदत दिली जाणार आहे. मदतीच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने याला बराच कालावधी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहे. किमान पाच ते सात दिवस हे काम पूर्ण व्हायला लागतील, असे बँकेकडून सांगितले जाते.मदतीसंदर्भात बँकेचे संचालक बाबू पाटील वानखेडे म्हणाले, याद्या पूर्णपणे तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैशाचे वाटप केले जाणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.मोहदा येथे मदतीच्या यादीत घोळमोहदा : तलाठी आणि डीटीपी आॅपरेटर्सच्या बेजबाबदारपणाचा फटका मोहदा परिसरातील बोंडअळीग्रस्तांना बसत आहे. निधी मंजूर झालेल्या यादीत नाव आहे मात्र त्यासमोर बँक खात्याचा तपशीलच भरलेला नाही. हा प्रकार आसोली या गावात अधिक प्रमाणात आहे. शिवाय या गावातील काही शेतकरी खातेदारांची नावे सर्वे होऊनही मदत निधीसाठी पाठविली गेली नाही. मदत मिळत असलेल्या शेतकऱ्यांनाही विविध कागदपत्र सादर करावी लागत आहे. बँक ते तलाठी या फेऱ्यातच शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती