शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

हेल्मेटधारकांना गुलाबपुष्प, टाळणाऱ्यांना दिली चलान

By admin | Updated: February 25, 2016 02:19 IST

यवतमाळ शहरात वाहतूक शाखेने हेल्मेट सक्तीसाठी मोहीम राबविणे सुरू केले असून दुसऱ्या दिवशी एका पोलीस अधिकाऱ्यासह १३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हेल्मेट सक्ती : पोलीस अधिकाऱ्यासह १४० वाहनधारकांना दंडयवतमाळ : यवतमाळ शहरात वाहतूक शाखेने हेल्मेट सक्तीसाठी मोहीम राबविणे सुरू केले असून दुसऱ्या दिवशी एका पोलीस अधिकाऱ्यासह १३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर हेल्मेट घालून नियमांचे पालन करणाऱ्यांचे वाहतूक शाखेने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे. पोलिसांच्या या कारवाईने अनेकांची भंबेरी उडाली आहे. यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने मंगळवारपासून शासकीय कार्यालयासमोर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दुसऱ्या दिवशी ही मोहीम अधिक गतिमान करण्यात आली. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जीवन विमा कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक कार्यालयीन वेळेपूर्वीच दाखल झाले. कार्यालयात येणाऱ्या आणि हेल्मेट नसणाऱ्यांना अडवून त्यांना दंड ठोठावण्यात आला. तब्बल १३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आणखी सुरू राहणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख दिलीप चव्हाण यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)१३ पोलिसांचा समावेश एकीकडे पोलीस खाते हेल्मेट सक्तीसाठी दंडात्मक कारवाई करीत आहे. तर दुसरीकडे त्याच खात्यातील पोलीस विना हेल्मेट शहरात दुचाकीने फिरत आहे. अशा १३ पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे. तर ज्या नागरिकांनी हेल्मेट घालून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.