शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बळींचा उच्चांक; 37 जण नेले, 810 पछाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

सोमवारी झालेल्या एकूण ३७ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५, ८०, ६५, ६०, ५७, ५५, ४५, ४५, ६५, ९७, ६० वर्षीय पुरुष आणि ६५, ४८, ७३, ६५, ३६, ६५, ७३, ४७  वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील  ५८, ५५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.

ठळक मुद्देअंत्यविधींची दाटी : सर्वाधिक २३ मृत्यू यवतमाळचे, ५७२० ॲक्टिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे मन हेलावून, हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने दररोज अंत्यविधी पाहण्याचे दुर्दैवी दिवस आणले आहेत. रोज जीव घेणाऱ्या कोरोनाने सोमवारी मृत्यूसंख्येचा उच्चांक करीत तब्बल ३७ जणांचा बळी घेतला.  त्यातील २२ मृतक हे एकट्या यवतमाळातील आहेत. तर दिवसभरात जिल्ह्यातील आणखी ८१० जणांना बाधित करून या विषाणूने आपल्या जबड्यात ओढले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा ९२३ झाला असून सध्या ५७२० ॲक्टिव्ह रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरू आहे.सोमवारी झालेल्या एकूण ३७ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५, ८०, ६५, ६०, ५७, ५५, ४५, ४५, ६५, ९७, ६० वर्षीय पुरुष आणि ६५, ४८, ७३, ६५, ३६, ६५, ७३, ४७  वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील  ५८, ५५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे. पुसद येथील ५५ वर्षीय महिला, पुसद तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला, वणी तालुक्यातील ५७ वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ४० वर्षीय पुरुष व ४२, ५९ वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ५० वर्षीय महिला, आर्णी तालुक्यातील ५७ वर्षीय महिला, केळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, कळंब येथील ४९ वर्षीय महिला आणि घाटंजी तालुक्यातील ७५ वर्षीय महिला आदींचा मृतकांमध्ये समावेश आहे. तर खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ५१ वर्षीय महिला, उमरखेड येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.  सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या ८१० जणांमध्ये ४७५ पुरुष आणि ३३५ महिला आहेत. यात यवतमाळ येथील ३०० रुग्ण, पांढरकवडा १५२, उमरखेड ७५, दिग्रस ६९, पुसद ३३, वणी ३१, कळंब २९, नेर २८, बाभूळगाव २१, घाटंजी १२, मारेगाव ११, राळेगाव ११, महागाव १०, दारव्हा १०, आर्णी ९, झरीजामणी १ आणि इतर शहरातील ८ रुग्ण आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार, सोमवारी ४६१९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१० पॉझिटिव्ह आले. तर ३८०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५७२० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी २७७० जण रुग्णालयात भरती आहेत. तर २९५० जण गृह विलगीकरणात रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१ हजार ४५७ झाली आहे. गेल्या २४ तासात ८९२ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ३४ हजार ८१४ आहे. तर जिल्ह्यात एकूण ९२३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.८७ असून मृत्युदर २.२३ आहे.आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३८९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ३०९५ अप्राप्त आहेत. तसेच ३ लाख ४ हजार ८३७ नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले. 

यवतमाळच्या मोक्षधामात धगधगल्या २१ चिता

 कोरोना बळी वाढत असल्याने बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी प्रशासनावरच येवून पडत आहे. सोमवारी यवतमाळच्या पांढरकवडा रोड स्थित मोक्षधामात तब्बल २१ पार्थिवांना भडाग्नी देण्यात आला. स्मशानातील जागा आणि मृतदेहांची संख्या पाहून अंत्यविधीचे तीन टप्प्यात नियोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १२ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ८ तर तिसऱ्या टप्प्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात धगधगणाऱ्या चिता पाहून मोक्षधामाचे वातावरणही गहिवरले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या