शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पुसद उपविभागात दमदार पाऊस

By admin | Updated: June 20, 2016 02:19 IST

चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी कोसळलेल्या धो-धो पावसाने मोठा दिलासा मिळाला.

शेतकरी सुखावला : पुसद ५४ मिमी, महागाव ७४ मिमी पाऊसंपुसद : चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी कोसळलेल्या धो-धो पावसाने मोठा दिलासा मिळाला. पुसद उपविभागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पुसद तालुक्यात ५४ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ९५ मिमी पाऊस कोसळला आहे. तर महागाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी धुव्वाधार पाऊस बरसला. ७४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मृग नक्षत्र लागल्यानंतरही पावसाचे कुठेच वातावरण दिसत नव्हते. बळीराजासह शेतकरी चिंतातूर झाला होता. बहुतांश शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून पेरण्या केल्या. परंतु पाऊस न आल्याने या पेरण्या संकटात सापडल्या होत्या. मात्र शनिवारी रात्र भर पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. १ जून ते १७ जूनपर्यंत ४१ मिमी पाऊस कोसळला तर शनिवारी ५४ मिमी असा पुसद तालुक्यात ९५ मिमी पाऊस कोसळला आहे. मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पुसदकरांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पूस नदीचे पात्र खळखळून वाहत असून विहिरी व हातपंपाच्या जलस्रोतात वाढ झाली आहे. खोळंबलेल्या पावसाने रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या. महागाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजता धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने नदीनाले भरुन वाहू लागले. गुंज गावातील नाल्याला आलेल्या पुराने एक तास वाहतूक ठप्प होती. धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. १८ जून रोजी तालुक्यात ७४ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद असून आतापर्यंत तालुक्यात ९४ मिमी पाऊस कोसळला आहे. तालुक्यात ६२ हजार ८५० हेक्टर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. परंतु अपेक्षित पाऊस न आल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. अशातच शनिवारी झालेल्या पावसाने आशा पल्लवित झाल्या आहे. तर कृषी माल विक्रेत्यांची बाजारपेठही चांगलीच फुलली आहे. फुलसावंगी परिसरात मृगाचा दमदार पाऊस बरसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई संपुष्टात आली आहे. कोरड्या पडलेल्या नदी व नाल्यांमध्ये पाण्याचा खळखळून वाहत आहे. पावसाचे आगमन झाल्याने उत्साही वातावरण आहे. (लोकमत चमू)