शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कमिशनच्या वाट्यासाठी हृदयविकाराचे नाट्य !

By admin | Updated: August 8, 2014 00:12 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना

यवतमाळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना तज्ञाविनाच काम पूर्ण केले. यात ६४ लाख ५३ हजार ७२० रुपयांचे चढ्या दराने देयक काढून हे काम करण्यात आले. एवढच नाही तर जास्त पैसा खर्च होण्यासाठी सेंट्रलाईज सोलर युनीटलाही बगल देण्यात आली. विशेष असे की, वरिष्ठ अधिकाऱ्याला कमीशनचा वाटा द्यावा लागू नये म्हणून चक्क एका अधिकाऱ्याने हृदयविकाराचे कारण पुढे करून तो रुग्णालयात दाखल झाला. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये आणि परिसरात सौर पथदिवे लावण्यात आले. येथील नेहरू स्टेडियममधील प्रांगणातही ३१२ सौर पथदिवे लावण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला काही अटी आणि शर्ती ठेऊन मंजूरात देण्यात आली. मात्र जास्त पैसा खर्च करून कमीशन मिळावे यासाठी सेंट्रलाईज सिस्टीम लावण्या ऐवजी प्रांगणात सौर पथदिवे लावण्यात आले. कार्यालयाच्या छतावर पॅनल लावून एखाद्या खोलीत बॅटरी ठेवल्या असत्या तर त्यांची सुरक्षा राहिली असती. ईमारतीवरील उष्णता शोषली जाऊन भुमिगत केबलव्दारे उर्जा पुरवठा सुलभ झाला असता. सौर पथदिव्यांच्या तुलनेत सेंट्रलाईज युनीट स्वस्त पडले असते. मात्र एका पुढाऱ्याला खुश करण्यासाठी आणि लाखोंच्या कमिशनचा वाटा मिळण्यासाठी पथदिव्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. कंत्राटदार कंपनीने हे काम पूर्ण केल्यानंतर देयके काढण्यातही धिसाडघाई करण्यात आली. ही बाब कंत्राट देणाऱ्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला कळताच तो यवतमाळात दाखल झाला. संबंधित अधिकाऱ्यालाही तो कमिशनसाठी येणार असल्याची कुणकुण लागली. कमिशनचा वाटा द्यावा लागू नये म्हणून कंत्राट देणारा अधिकारी हृदयविकाराचे कारण पुढे करून थेट एक खासगी रुग्णालयात दाखल झाला. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यानेही त्याच्यावर बदलीचे हत्यार उपसले. त्यामुळे भितीतून या अधिकाऱ्याने रुग्णालयातून सुटी घेतली. तसेच लगबगीने कार्यालय गाठून वरिष्ठाला कमिशनचा वाटा दिल्याचे खुद्द क्रीडा कार्यालयातूनच सांगण्यात आले. यापूर्वी असाच घोटाळा चंद्रपूर येथे झाला आहे. त्याचीच ही पुनर्रावृत्ती असल्याचे बोलल्या जाते. यासंदर्भात अमरावतीचे क्रीडा उपसंचालक जयप्रकाश ढुबळे आणि यवतमाळचे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांच्या मोबाईलवर संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)