शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सभापतींचा प्रभाग बरबटला

By admin | Updated: June 16, 2017 01:41 IST

शहरात स्वच्छतेचा बोजवरा उडाला असून खुद्द आरोग्य सभापतींच्या प्रभाग क्रमांक १६ मध्येच विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

यवतमाळ नगरपरिषद : नाल्या तुंबल्या, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात स्वच्छतेचा बोजवरा उडाला असून खुद्द आरोग्य सभापतींच्या प्रभाग क्रमांक १६ मध्येच विदारक स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभागातील नागरिक त्रस्त झाले असून पालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या क्षेत्रातील स्वच्छतेची यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. ऐन पावसाळ््यात नागरी वस्त्यामध्ये कचऱ्याचे ढिगारे लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या कचऱ्यातून उग्र दर्प येत असल्याने वसाहतीमध्ये राहणे कठीण झाले आहे. प्रभाग १६ मधील अंजेनय सोसायटीच्या अगदी प्रवेद्वारावरच कचऱ्याचा मोठा ढिग आहे. येथील नाल्याची कधीतरी सफाई होत असून ती रस्त्याच्या कडेवर काढून ठेवली जाते. पावसाच्या पाण्याने ही घाण वाहून इतरत्र पसरण्याची भीती आहे. चिन्मय बालआश्रमासमोरच कचऱ्याचा ढिग असून तिथे मोकट जनावरे, कुत्रे, डुक्कर यांचा मुक्त संचार असतो. हा कचरा पसरविण्याचे काम या प्राण्यांकडून केले जाते. प्रभागातील समस्योबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच उपाय योजना केली जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. ठाकूर प्लॉट परिसरातील सर्वाजनिक हापसी बंद असल्याने तिथे पाणी टंचाई आहे. सिंघानिया नगरात शिवाजी महाराजांच्या तैल चित्रासमोर कचऱ्या ढिग लागतो. अनेक भागात घंटा गाडीच फिरकत नसल्याने घरातील कचरा उघड्यावर टाकण्या शिवाय पर्याय नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. इतर प्रभाग भयावहभाजपाच्या सत्ताधारी आरोग्य सभापतींच्या प्रभागीच स्थिती गंभीर असले तर इतर प्रभागांची कल्पना ा केलेलेच बरे. एकीकडे केंद्र आणि राज्य शासनाकडून स्मार्ट सिटी याजनेची संकल्पना राबविली जात आहे. तर भाजपाची सत्ता असलेल्या पालिकेत मात्र दैनंदिन स्वच्छतेची कामे व्यवस्थित होताना दिसत नाही. स्वच्छतेवर पालिकेकडून महिन्याकाठी लाखो रुपये खर्च केले जातात. हा पैसा नेमका कशावर खर्च होतो असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.