शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नेर बांधकामचा हेकेखोरपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:56 IST

शहरातील अतिक्रमण हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेकेखोरपणाची प्रचिती आली. काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी बराच वेळ देण्यात आला, तर प्रामुख्याने लहान व्यावसायिकांच्या दुकानांचा चेंदामेंदा केला.

ठळक मुद्देदुकानांचा चेंदामेंदा : अतिक्रमण हटाओ मोहिमेत दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरातील अतिक्रमण हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेकेखोरपणाची प्रचिती आली. काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी बराच वेळ देण्यात आला, तर प्रामुख्याने लहान व्यावसायिकांच्या दुकानांचा चेंदामेंदा केला. या शिवाय काही लोकांच्या खासगी जागांमध्ये लावलेली दुकानेही काढण्याची संधी यानिमित्ताने साधण्यात आली. हा प्रकार करताना आर्थिक व्यवहारही झाल्याची ओरड अन्यायग्रस्तांमधून होत आहे.अतिक्रमणात येत असलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना नोटीस दिल्या. त्यानुसार काही लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. अमरावती मार्गापासून नालीपर्यंतचे अतिक्रमण काढण्यासाठी आखणीही करण्यात आली. मात्र पंचायत समिती परिसरात अतिक्रमण हटाओ मोहीम पथकाने मनमानी सुरू केली. आखणी केलेल्या जागेच्या बाहेर असलेली दुकाने पाडण्यास सुरुवात केली. थांबा... थांबा... आम्ही दुकाने काढतो, पण तोडू नका, अशी अतिक्रमणधारकांची विनंती या पथकाने मानली नाही.जुन्या बसस्थानक परिसरात अतिक्रमण हटविताना या पथकाने तर कहर केला. टीनपत्र्यांची दुकाने पाडण्यासाठी कमालीची घाई करण्यात आली. मात्र काँक्रिटची दुकाने पाडण्यासाठी संबंधितांना बराच अवधी देण्यात आला. वास्तविक काँक्रिटचे बांधकाम असलेल्या लोकांनाही अतिक्रमणातील बांधकाम पाडण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. अशावेळी बांधकाम विभागाने त्यांना संधी का दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बांधकाम उपअभियंत्यांच्या मनमानीचा या ठिकाणी कळस झाला.खासगी जागेतील दुकानेही या मोहिमेत पाडण्यात आली. तिथपर्यंत पोहोचण्याचा अधिकार या विभागाला आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मार्गावर काही लोकांनी खासगी जागेमध्ये आपला छोटासा व्यवसाय सुरू केला. ज्यांची जागा आहे, त्यांनी बांधकामच्या पथकातील लोकांना चिरीमिरी देऊन अशी अतिक्रमणे काढल्याचा आरोपही होत आहे. या सर्व प्रकारात बेरोजगार, गरीब व्यावसायिक अडचणीत आले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण