शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

शेतकऱ्याचा मुलगा झाला मुख्याधिकारी

By admin | Updated: April 9, 2016 02:36 IST

चोरखोपडी सारख्या खेडेगावात राहून संघर्षशील शेतकऱ्याने आपल्या मुलाला शिकविले आणि मुलानेही कठीण परिश्रम करून त्याचे फलित केले.

परिश्रमाचे फळ : चोरखोपडी येथे आनंदमुकेश इंगोले  दारव्हाचोरखोपडी सारख्या खेडेगावात राहून संघर्षशील शेतकऱ्याने आपल्या मुलाला शिकविले आणि मुलानेही कठीण परिश्रम करून त्याचे फलित केले. सध्या दारव्हा येथे वास्तव्यास असलेल्या चोरखोपडी येथील नीलेश गोविंदराव जाधव याची नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य सेवा आयोग परीक्षेच्या निकालात मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. त्याने केवळ आपल्या गावचेच नव्हे तर तालुक्याचे नाव मोठे केले आहे. त्याचे वडील गोविंदराव जाधव यांनी अत्यंत मेहनतीने शेतीच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. आज त्यांचा उल्लेख प्रगतीशील शेतकऱ्यांमध्ये केल्या जातो. तीन मुलांमधील नीलेश हा सुरूवातीपासूनच अतिशय परिश्रमी होता. तिसरीपर्यंत तो चोरखोपडी येथेच व त्यानंतर कारंजालाड येथे शिक्षणासाठी गेला. त्याठिकाणी दहावी व बारावी ७५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. डीएडनंतर २००७ मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली. परंतु एवढ्यावर समाधान न मानणाऱ्या नीलेशने अत्यंत जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी त्याची निवड झाली. परंतु तिथे रुजू न होता, तो पुढील ध्येयासाठी परिश्रम करीत राहिला. यानंतर त्याला मुख्य परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागला. परंतु त्यामुळे खचून न जाता त्याने सातत्यपूर्ण परिश्रम सुरू ठेवले आणि लवकरच त्याची ध्येय प्राप्ती झाली. वडिलांनी निर्णय घेण्यासाठी दिलेले स्वातंत्र, विश्वास यामुळेच हे यश मिळाल्याचे नीलेश सांगतो. ग्रामीण भागात राहुन कोणतेही मोठे शहरातील क्लास न लावता निलेशने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी न डगमगता सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित असल्याचे निलेशने दाखवून दिले. त्याच्या यशाने चोरखोपडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.