शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

वो कल भी पास थी, वो आज भी करीब है

By admin | Updated: June 20, 2015 00:10 IST

आपल्या कर्तृत्वाने अजराम होणारी व्यक्ती सदैव आपल्या अवती-भोवतीच असते.

ज्योत्स्ना दर्डा जन्मदिन : स्मृतिरंग कार्यक्रमात सागर आणि यशश्रीच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध काशीनाथ लाहोरे यवतमाळ आपल्या कर्तृत्वाने अजराम होणारी व्यक्ती सदैव आपल्या अवती-भोवतीच असते. देह जरी पंचतत्वात विलिन झाला तरी कार्यसुगंध टिकून राहतो. सार्वजनिक जीवनात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून माणसे जोडणारी व्यक्ती तर अनेकांच्या हृदयाच्या कप्प्यात चिरंतर वास करते. ‘वो शाम कुछ अजीब थीए शाम भी कुछ अजीब हैवो कल भी पास पास थीवो आज भी करीब है’ हे किशोरकुमारांच्या आवाजातील खामोशी चित्रपटातील गीत विदर्भाचे किशोरकुमार म्हणून ओळखले जाणारे गायक सागर मधुमटके यांनी सादर केले, तेव्हा सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीतावर निस्मीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित स्मृतीरंग कार्यक्रमाचे. खचाखच भरलेल्या सभागृहात किशोरकुमार म्हणून नावलौकिक असलेले सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके आणि इंडियन आयडॉलमध्ये विदर्भाचे नाव कमावणारी गुणी गायिका यशश्री भावे-पाठक यांनी आपल्या विशिष्ट गायनाद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यवतमाळातील प्रसिद्ध संगीतकार बाबा-किशोर यांच्या नटराज अ‍ॅकेडमीने संगीत नियोजनाची कामगिरी तितक्याच उत्कृष्टपणे पार पाडली की नागपूरचे गायक कलावंतही भारावून गेले. हरहुन्नरी निवेदिका अनुजा घाडगे यांनी कलाकार, चित्रपट यातील गमती-जमती सांगून रसिकांच्या हृदयाचा ताबा घेतला. हरफमौला किशोरकुमार यांची अनेक गाणी या कार्यक्रमात सादर केली. कुछ तो लोग कहेंगेलोगो का काम है कहनाहे गीत श्रोत्यांची दाद देऊन गेले. यशश्री भावे आणि सागरने आराधना या चित्रपटातील ‘कोरा कागज था ये मन मेरालिख लिया नाम इसपे तेरा’ हे गीत सादर केले. मराठी गाणी आणि मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करणारे भावगीत ‘मेंदीच्या पानावर, मन अजून झुलते गजाईच्या पाकळ्या, दव अजून झेलते ग’कविवर्य सुरेश भटांच्या या तरल, कोमल आणि भावस्पर्शी गीतांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. कटी पतंग चित्रपटातील गाण ‘ये शाम मस्तानी’ ने तरुणांना डोलविले. तर ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ हे गीत सादर केले तेव्हा विजयबाबू भावूक झाले. यवतमाळचा कलाकार अजिंक्य सोनटक्के यांनी फ्युजन संगीत सादर करून भावी जीवनाची दिशा स्पष्ट केली. तर सखी मंचच्यावतीने आयोजित भुले बिसरे गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी शुभलक्ष्मी कुलकर्णी हिला स्मृतीरंग कार्यक्रमात गीत सादर करण्याची संधी देण्यात आली. ‘केशरिया बलमा’ हे गीत तिने सादर केले. तेव्हा संपूर्ण सभागृह दणाणून गेले. ‘गाता रहे मेरा दिल, तुही मेरी मंझील’, बादल बिजली चंदन पाणी, जैसा अपना प्यार’, ‘देखा एक ख्वॉब तो ये सिलसिले हुअ‍े’, ‘जिंदगी का सफर, है ये कैसा मगर’, ‘मेरे सपनो की रानी तु कब आयेगी तु’, ‘औ खैके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ आदी गाणी सागर आणि यशश्रीने सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. यशश्रीने अनेक राजस्थानी गाणी सादर करून मैफिलीत उत्साह भरला तर सागरने रसिकांमध्ये जाऊन त्यांना ताल धरायला भाग पाडले. श्रोत्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहात हसतमुख आणि भरपूर माहितीचा खजाना रसिकांसमोर विनम्रपणे अपर्ण करणारी निवेदिका अनुजा घाडगे यांनी संपूर्ण कार्यक्रमावर आपली छाप सोडली. सुरुवातीला ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, माजी खासदार जांबुवंतराव धोटे, माजी आमदार विजयाताई धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, अ‍ॅड. ए.पी. दर्डा यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. आभार किशोर दर्डा यांनी मानले. ‘महावीर नमन’ सीडीचे प्रकाशनलोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा रचित ‘महावीर नमन’ या सीडीचे प्रकाशन स्मृतीरंग कार्यक्रमात करण्यात आले. या सीडीच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम धर्मदाय कामांसाठी वापरली जाणार आहे. सखी मंचच्या भुले बिसरे गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शुभलक्ष्मी कुळकर्णीने स्मृतिरंगमध्ये गीत सादर केले.