शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हर्षलने शोधला मशरूम शेतीतूून उन्नतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:58 IST

‘गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी एैसे’ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे गरज ही मानवाला धडपड करायला लावते. त्यातून जिद्द निर्माण होऊन नवनिर्माण घडू शकते.

ठळक मुद्देमांगलादेवीचा तरुण : जिद्द आणि परिश्रमाला मिळाली ध्येयाची जोड

आॅनलाईन लोकमतमांगलादेवी :‘गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी एैसे’वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे गरज ही मानवाला धडपड करायला लावते. त्यातून जिद्द निर्माण होऊन नवनिर्माण घडू शकते.आज सर्वत्र निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी, शासनाचे अडेलतट्टू धोरण, त्यामुळे आजचा तरुण शेतीकडे न वळता नोकरी, व्यवसायाच्या मागे लागला आहे. परंतु बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर आहे. रोजगाराच्या संधी नाही म्हणून तो स्वस्थ बसला नाही. मशरूमच्या शेतीतून त्याने बेरोजगारीवर मात करीत प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग शोधला आहे.नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथील हर्षल विजय राऊत याची ही यशकथा. इतर तरुणांनीसुद्धा आदर्श घ्यावा, अशी त्याच्या श्रमाची किमया आहे. वडील राष्ट्रसंतांच्या विचारधारेचे, शिक्षकी पेशा. हर्षल सध्या अमरावती येथे बीएससी कृषीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. शेती निसर्गावर अवलंबून आहे, तर नोकरीच्या संधी फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून त्याने जास्त नफा मिळवून देणारा मशरूम शेतीचा पर्याय निवडला. त्याने घरीच बेडवर मशरूमची लागवड केली. त्यासाठी सोयाबीनचे कुटार, ताराच्या रिंग, दोरी, फार्मालीन आदी साहित्याची जुळवाजुळव केली. सोयाबीनचे कुटार रात्रभर पाण्यात भिजवू घातले. नंतर त्याला सकाळी गरम पाण्यात उकळून थंड होऊ दिले. त्यात मशरूमचे बुरशी लागलेले गहू कुटारात मिसळून प्लास्टिकमध्ये भरले. नंतर तारेच्या गोल रिंगमध्ये ठेऊन एकमेकांवर दोरीने टांगले.प्रत्येक बेडमधून ४० दिवसात मशरूमचे पीक घेतल्या जाते. एका बेडचा उपयोग सलग तीनवेळा घेता येतो. चांगले मोठे वाढलेले मशरूम काढून त्याला सुकवून बाजारात विक्रीस पाठविले जाते. बाजारात १२०० रुपये किलो भाव आहे. त्याचा खर्च सुरुवातीला अंदाजे तीन ते चार हजार रुपये आहे तर, उत्पन्न अंदाजे २१ हजार रुपये येईल, असा विश्वास हर्षल राऊतने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.