भागवत कथा : कीर्तन-प्रवचनांचे आयोजनउमरखेड : शहरालगतच्या झाडगाव (बाळगी) येथील जागृत हनुमान मंदिराचा कलशरोहण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसंत साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश देवसरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कलशारोहण गुरु महेश भारती व धनेश्वर भारती यांच्या हस्ते करण्यात आले. भागवताचे वाचन बाबूराव महाराज तेरकर यांनी केले. या सप्ताहात एकनाथ महाराज इहळेकर, बापूराव महाराज सावळेश्वर, दिलीप घोरे महाराज, संतोष महाराज उचेगाव, आनंतराव गुरुजी शेवाळा, नामदेव महाराज वडगाव, डॉ. लक्ष्मीकांत रावते ढाणकी, दिलीप माऊली साखरा यांनी कीर्तनाची सेवा दिली. सप्ताहाच्या शेवटी व्यसनमुक्ती व गोपालन प्रचारक बाबूराव महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. सात दिवसाच्या या सप्ताहात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी चंदू गिरी, विठ्ठल कुबडे, सुधाकर गिरी, प्रभाकर गिरी, नितीन कुबडे, प्रमोद गिरी, मनोज गिरी, पवन गिरी, बालू कुबडे, परशराम बयेवाड, पोलीस पाटील स्वप्नील गिरी, देवीदास खुडे, संजय भांगे, मनोज भुरके, विनोद गिरी, पिंटू बधेवाड, चिमन कुबडे, प्रवीण गिरी, धिरज गिरी, प्रफुल्ल गिरी, सुनील आमले यांनी परिश्रम घेतले. प्रकाश देवसरकर व त्यांच्या पत्नी निकिता देवसरकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे गावात सात दिवस भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. (प्रतिनिधी)
झाडगाव येथे हनुमान मंदिर कलशारोहण
By admin | Updated: April 25, 2016 02:18 IST