‘जेडीआयईटी’चा पुढाकार : प्रेरणास्थळ आयोजन समितीचा उपक्रमयवतमाळ : प्रेरणास्थळ आयोजन समितीच्या उपक्रमांतर्गत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागातर्फे हंडी डेकोरेशन आणि गिफ्ट व्रॅपिंग स्पर्धा घेण्यात आली. गोकुळाष्टमीचे औचित्य साधून प्रेरणास्थळावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.हंडी सजावट स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. पहिली ते सहावीच्या पहिल्या गटात प्रथम पारितोषिक अंजली खडसे, द्वितीय भूमिका हेडावू, तर तृतीय पारितोषिक पूर्वा बोरकर यांनी पटकाविले. वर्ग सात ते बाराच्या द्वितीय गटात प्रथम बक्षीस रिया निमजे, द्वितीय नयन चांडक, तर तृतीय बक्षीस हर्षा दायरे हिने प्राप्त केले. तृतीय महाविद्यालयीन गटात अयुरी लिमजे, कल्याणी घाटे आणि अश्विनी अरसोड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक पटकाविले. गिफ्ट व्रॅपिंग स्पर्धेच्या पहिल्या बक्षिसाची मानकरी प्राची खरतडे ठरली. शिवराज डोंगरे याने द्वितीय, तर अंजली खडसे हिने तृतीय बक्षीस मिळविले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव किशोर दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, आयटी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अतुल राऊत, गेट क्लबचे प्रभारी मकरंद शहाडे, संयोजक प्रा. सतीश ठोंबरे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. ओंकार चांदुरे, प्रा. चैताली सुरतकर आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून मोनिका ढवळे आणि मोनाली इंगोले यांनी काम पाहिले. संचालनाची जबाबदारी पूजा बुटले हिने पार पाडली. आभार अयुरी लिमजे हिने मानले. कार्यक्रमासाठी प्रा. कोमल पुरोहित, प्रा. जागृती वानखडे, प्रा. प्रियंका शिरभाते, प्रा. रणजित शेंडे, प्रा. अश्विनी राठोड, प्रा. अश्विनी इंगळे, प्रा. युगंधरा ढेपे, प्रा. सोनाली झुनके, गेट क्लब अध्यक्ष हृषीकेश जाधव, शुभम खरवडे, सौरभ श्रीरंग, पंकज मुलचंदानी, विनोद देवतळे, अनिस भाटी, इशा शिरभाते, गौरी माळी, शरयू चोरमले, अंकिता अंदूरकर, अक्षय निबोकर, अनिकेत गुलवाडे, आरती मनुधने, दीक्षा देशमुख आदींनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, आयटी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अतुल राऊत आदींनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)
हंडी डेकोरेशन व गिफ्ट व्रॅपिंग स्पर्धेला उदंड प्रतिसाद
By admin | Updated: September 14, 2015 02:29 IST