शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महागाव बॅंकेत शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

हा प्रकार येथील युनियन बॅंकेच्या शाखेत मंगळवारी सकाळी घडला. पीक कर्जासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथे गर्दी केली होती. कामात उशीर होत असल्याचे पाहून शेतकरी अस्वस्थ झाले. त्यातून बॅंक कर्मचारी आणि शेतकऱ्यांची हुज्जत सुरू झाली. तालुक्यातील बोंढारा येथून आलेल्या विजय राठोड या शेतकऱ्याला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची चर्चा पसरली. या घटनेचा व्हीडीओही व्हायरल झाला. प्रत्यक्षात शेतकऱ्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली.

ठळक मुद्देआधी मारहाणीची चर्चा, नंतर सारवासारव

 लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पीक कर्जासाठी प्रचंड गर्दी झाल्यानंतर बॅंक कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. मात्र गावात बोभाटा झाल्यानंतर आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणात बॅंक कर्मचाऱ्यासह शेतकऱ्यानेही घुमजाव केले. हा प्रकार येथील युनियन बॅंकेच्या शाखेत मंगळवारी सकाळी घडला. पीक कर्जासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथे गर्दी केली होती. कामात उशीर होत असल्याचे पाहून शेतकरी अस्वस्थ झाले. त्यातून बॅंक कर्मचारी आणि शेतकऱ्यांची हुज्जत सुरू झाली. तालुक्यातील बोंढारा येथून आलेल्या विजय राठोड या शेतकऱ्याला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची चर्चा पसरली. या घटनेचा व्हीडीओही व्हायरल झाला. प्रत्यक्षात शेतकऱ्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु बॅंकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहता ही तक्रार तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले. शेतकऱ्यानेही बॅंकेची माफी मागत आपली तक्रार मागे घेतली. बॅंकेचे अग्रीकल्चर ऑफीसर अक्षय घाटे यांनी पोलिसांना घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली. शेतकऱ्याने स्वत:च भिंतीवर स्वत:चे डोके आदळून घेतल्याचे सांगितले. संबंधित शेतकऱ्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचे बॅंक व्यवस्थापकांनी सांगितले. या घटनेची फिर्याद पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून चौकशी सुरू असल्याची माहिती दुपारी ठाणेदार बालाजी शिंगेपल्लू यांनी दिली. दरम्यान सायंकाळी शेतकऱ्याने स्वत:च तक्रार मागे घेतल्याने प्रकरण निस्तरले. मात्र या प्रकरणाची दिवसभर चर्चा होती.  

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक