शहरं
Join us  
Trending Stories
1
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
5
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
6
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
7
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
8
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
9
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
10
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
11
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
12
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
13
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
14
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
15
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
16
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
17
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
18
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
19
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
20
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'

सखी मंचच्यावतीने हळदीकुंकू कार्यक्रम

By admin | Updated: February 9, 2016 02:12 IST

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आणि प्रकृती जियोफ्रेश प्रायोजित सखींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन ...

१२ फेब्रुवारीला आयोजन : प्रकृती जियोफ्रेशचे सहकार्ययवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आणि प्रकृती जियोफ्रेश प्रायोजित सखींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन येथील दर्डा मातोश्री सभागृहात १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळात करण्यात आले आहे. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांत हा खास महिलांचा सण. या सणातून संस्कृती संवर्धन व्हावे आणि सखींच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बिस्कीट, चहा पावडर, साखरेपासून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बिस्कीट कोणतेही चालेले, चुरा मात्र चालणार नाही. तसेच साखर ही पिठी साखर नसावी, चहा पावडरचा वापर करावा लागेल. सजावटीसाठी कप-बशीव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूचा वापर करता येणार नाही. या स्पर्धेसाठी दोन फुट बाय दोन फुटची जागा स्पर्धास्थळी दिली जाईल. या स्पर्धेसाठी ३० मिनीटांचा वेळ राहणार आहे. दुसरी स्पर्धा तिळापासून टिकली बनविणे आहे. कपाळाला लावायची टिकली पाच वेगवेगळ््या आकारात (शेप) मध्ये तयार करावी लागेल. यात कुंदन, रंग आणि जास्तीत जास्त तिळाचा वापर आवश्यक आहे. टिकली घरुन तयार करून आणावी. कार्यक्रमस्थळी मांडणीसाठी पाच मिनिटांचा वेळ दिला जाईल. दोन्ही स्पर्धेेसाठी लागणारे साहित्य घरून आणणे आवश्यक आहे. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय पुरस्कार दोन्ही स्पर्धेसाठी दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी नावे नोंदवावे लागेल. या स्पर्धेत केवळ २०१६ मध्ये सदस्य झालेल्या सखींनाच सहभागी होता येईल. सखी मंच सदस्य होणाऱ्या पहिल्या ५०० सदस्यांना घरकूल मसाले पाकीट देण्यात येईल. तसेच सर्व सखी मंच सदस्यांना ‘माय फिटनेस बुक’ देण्यात येणार आहे.या कार्यक्रमात चंद्रपूर येथील सखी ज्वेलर्स करून सिलव्हर प्लेटेड कुयरी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन लोकमत सखीमंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केली आहे. प्रकल्प अधिकारी म्हणून सुरूची खरे (७७६८९७६६८८), अपर्णा परसोडकर (९५५२३८३०७०), रेखा गांधी (९४०४५२४४३७), शैलजा दरक (९४०३२६५४२८), शिल्पा नथवानी (९४०३६१२५००), प्राप्ती गांधी (७७९८२३७०७०), दीपा तम्मेवार (९६८९९९२५०३), शुभदा हातगावकर (९८९०७७९४३४), स्मीता गंधे (८८८८४८४५७०) या राहतील. अधीक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ८६००६१०७०६ या क्रमांकावर संपर्क साधवा. कार्यक्रमस्थळी सदस्य नोंदणी सुरू राहील. (उपक्रम प्रतिनिधी)