शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

गारपीटग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

By admin | Updated: August 29, 2015 02:41 IST

फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे.

केवळ येरझारा : अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष दारव्हा : फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे. त्यावेळी झालेल्या नुकसानानंतर महसूल व कृषी विभागाने संयुक्त सर्वे करून अहवाल दिला होता. त्या अहवालात पिकाचे ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचे दाखविल्यानंतरही अद्यापपर्यंत मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. २८ फेब्रुवारी २०१४ ला झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे देऊळगाव येथील शेतकरी अंकुश दत्ताप्य लाभसेटवार यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गारपीटीमुळे लाभसेटवार यांच्या शेतातील चन्याचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु वर्षभरानंतरही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. या गारपिटीनंतर झालेल्या संयुक्त सर्वेत लाभसेटवार यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरीनिशी तसा अहवालसुद्धा प्रशासनाला देण्यात आला. परंतु प्रत्यक्ष मदतीच्या यादीत मात्र लाभसेटवार यांच्यासह काही शेतकऱ्याचे नाव नव्हते. त्यामुळे कृषी व महसूल अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या लोकशाही दिनात तक्रार केली तेव्हा १६ जून २०१५ ला त्यांना त्यांच्या शेतात हरभरा पिकाचा पेरा नसल्याने ते मोबदल्यास पात्र ठरत नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: कोलमडला असल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची अंकुश लाभसेटवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, चौकशी करून मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)