शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर बोंडअळ्यांची ‘गुलाबी गँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 22:11 IST

बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे.

ठळक मुद्देफवारणीलाही जुमानेना : प्रत्येक बोंडात अळी, वणी उपविभागात प्रकोप, शेतकºयांचा वैताग

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे. वणी तालुक्यासह मारेगाव व झरी तालुक्यात कपाशीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचा वैताग वाढला आहे. गंभीर बाब ही की, कोणत्याही फवारणीला या अळ्या जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषधे विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद बनले आहे. वणी, झरी व मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे पिक घेतले जाते. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. वणी उपविभागात फवारणीमुळे विषबाधेच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्यात. त्यामुळे शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळेनासे झाले. त्यातच कृषी विक्रेत्यांनी कारवाईच्या भितीने फवारणीची औैषधे विकणेच बंद केले. त्यात २ नोव्हेंबरपासून कृषी विक्रेत्यांचा संप सुरू होत आहे. परिणामी आता काय करावे, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून पाहिल्यानंतर त्यात गुलाबी अळी असल्याचे दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरून काढत आहे. यामुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शेतकºयांवर संकटांची मालिकाएकीकडे रोगांच्या प्रादुर्भावाने पिके धोक्यात आली असताना त्यावर फवारणी करण्यासाठी औषधे मिळत नाहीत. औैषधे मिळाली तर विषबाधेच्या भितीने फवारणीसाठी मजूर मिळत नाहीत. या संकटाशी शेतकरी झुंजत असताना वीज वितरण कंपनीने शेतकºयांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केले आहे. पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. सिंचनाअभावी ही पिके वाळण्याची शक्यता आहे. पिके हाती येण्याच्या स्थितीत असताना रानडुक्कर, रोह्यांचे कळप शेतात शिरून पिके उद्ध्वस्त करीत आहेत. संकटांच्या या मालिकेने शेतकरी खचून गेला आहे. गेल्या २० वर्षांत अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही, असे निंबाळा येथील शेतकरी राजेंद्र आसेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बोंडअळीच्या त्रासाने दोन एकर पºहाटीवर फिरविला नांगरसहा एकरातील कपाशीच्या प्रत्येकच बोंडात गुलाबी अळीचा प्रकोप झाला. त्यामुळे वैतागलेल्या एका शेतकºयाने बुधवारी सहापैकी दोन एकरातील कपाशीवर नांगर फिरविला. देवीदास पोरजलवार असे सदर शेतकºयाचे नाव असून तो झरी तालुक्यातील पाटण येथील रहिवासी आहे. पाटण गावालगतच त्याचे शेत आहे. आणखी एक एकरमधील कपाशीचे पीक काढून टाकणार असल्याचे देवीदासने ‘लोकमत’ला सांगितले. यंदा बोंडअळीमुळे एकरी केवळ चार क्विंटल कापूस झाला. बोंडअळीमुळे पुढे झाडांना कापूस फुटेल याची कोणतीच शाश्वती नसल्याने आपण कपाशीचे पिक काढून फेकल्याचे तो म्हणाला.