शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन

By admin | Updated: April 2, 2017 00:23 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रवीण पटेल व डॉ. एस.आर. वेंगसरकर लाभले होते. डॉ. वेंगसरकर यांनी लीड्स विद्यापीठ युके इंग्लंड येथून १९६६ मध्ये टेक्सटाईल अभियांत्रिकीत पीएच.डी. संपादन केली. २३ वर्षे कॉलिको फायबर व २० वर्षे झोनित फायबर बडोदा (गुजरात) येथे चिफ एक्झीक्युटिव्ह (सीईओ) म्हणून काम पाहिले. २५ पेक्षा अधिक देशांमध्ये टेक्सटाईल उद्योगासंबंधी कार्यात सहभाग घेतला. त्यांचे २० पेक्षा अधिक रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीस आॅफ पॉलीप्रोपेलीन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी १९७० च्या दशकात सर्वप्रथम पॉलीप्रोपेलीन उद्योग भारतात चालू करण्यासंबंधी मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात त्यांनी अप्लीकेशन आॅफ फायबर या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रवीण पटेल यांनी आयआयटी दिल्ली येथून जीयो टेक्सटाईल या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. त्यांना संशोधन औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्राचा तीन वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्यांचे ४० पेक्षा अधिक रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. मेडिटेक्स या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांना अमेरिकेत निमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेत त्यांनी अ‍ॅडव्हास स्पिनिंग टेक्नॉलॉजी आणि टेक्नीकल टेक्सटाईल या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन स्वप्नजा राऊत यांनी, तर आभार प्रा. प्रशांत रहांगडाले यांनी मानले. कार्यशाळेला प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, प्रा. सुरज पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, उमेश पाटील, निकेश धारिया, प्रणौती म्हैस्कर, लोमेश नारखेडे, उमेश पाटील, तेजस कापसे, दीपाली मुंडलिक, शुभम अवझाडे आदींनी पुढाकार घेतला. यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)