शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Suspended : IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
3
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
4
Operation Sindoor Live Updates: IPL सामने रद्द होण्याची शक्यता, BCCI घेणार निर्णय
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
6
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
7
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
8
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
9
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
10
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
11
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
12
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
13
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
14
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
15
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
16
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
17
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
18
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
19
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
20
Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी

टेक्सटाईल उद्योगातील घडामोडींवर मार्गदर्शन

By admin | Updated: September 19, 2015 02:31 IST

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात टेक्सटाईल उद्योगातील नवीन घडामोडी, ....

‘जेडीआयईटी’ : ‘टेसा’ क्लबचा पुढाकार

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात टेक्सटाईल उद्योगातील नवीन घडामोडी, तंत्रज्ञानाचा विकास, नोकरी आणि व्यवसाय यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ‘टेक्सटाईल डे’चे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली. व्यासपीठावर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शुभम श्रीवास्तव, प्रियंका सरिया, टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले आदी उपस्थित होते. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील गुणवत्ता प्राप्त आणि नामांकित पदावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शुभम श्रीवास्तव, प्रियंका सरिया प्रवीण दीक्षित, मुक्तेश्वर दीक्षित, श्रद्धा दुधे, वैष्णवी इंगळेकर, मीनल जयस्वाल या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. टेक्सटाईल डे साजरा करण्यासाठी या शाखेतील विद्यार्थी पारंपरिक पेहरावात सहभागी झाले होेत. विद्यार्थिनींनी नववारी, पैठणी, तर विद्यार्थ्यांनी कुर्ता, पयजामा आणि फेटा परिधान करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यशस्वीतेसाठी टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, सुरभी परळीकर, विक्रमजित सिंग, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी मयूर उजवणे, दीपाली राठोड, बिपीन पांडे, जुबेर पठाण, गजानन कदम, पूजा महल्ले, नगमा खान, श्याम शेंदूरकर, प्रियंका सानप, उमेश पाटील, युगा बोबडे, सायली देव, तृप्ती पाठक, क्षितिज झळके, दीपाली मुंडलिक आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)