शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंतु मतदानाच्या दोन दिवस आधी २४ मार्चला लॉकडाऊनमुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली.

ठळक मुद्देआयुक्तांचा युक्तिवाद व्यर्थ : फाईल विधी व न्याय विभागाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या १२ वर्षांपासून एकच संचालक मंडळ कायम असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्त करा यासाठी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड प्रचंड आग्रही आहेत. हा प्रशासक फार काळ टिकणार नाही अशी समजूत सहकार प्रशासनाने काढूनही पालकमंत्री काहीएक ऐकण्यास तयार नसल्याने अखेर प्रशासकाचा हा प्रस्ताव अभिप्रायासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंतु मतदानाच्या दोन दिवस आधी २४ मार्चला लॉकडाऊनमुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांंनी या बँकेवर प्रशासक नियुक्त करावा म्हणून दोन आठवड्यांपूर्वी शासनाला पत्र दिले आहे. या पत्राच्या अनुषंगाने अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) आणि सहकार आयुक्तांनी पालकमंत्र्यांना वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बँकेची निवडणूक घेतली जात आहे, शासनाने सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला सहा महिने मुदतवाढ दिली आहे, बँकेवर प्रशासक फार काळ टिकणार नाही, नियुक्त झाला तरी त्याला फारसे अधिकार राहणार नाही, निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते आदी मुद्यांची जाणीव करून दिली. परंतु पालकमंत्र्यांचा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा आग्रह कायम आहे. त्यामुळे या प्रकरणाची फाईल मुंबई उच्च न्यायालयाच्या सरकारी अभियोक्त्यांकडे पाठविली गेली. तेथून ही फाईल आता विधी व न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी गेली आहे. फाईलींचा हा प्रवास बँकेची निवडणूक लागेपर्यंत टाईमपास तर नव्हे ना अशी शंकाही बँकेच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आता बँकेची निवडणूक लागते की, प्रशासक नियुक्त करण्यात पालकमंत्र्यांना यश येते याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.लॉकडाऊनमध्येही मोबाईलद्वारे प्रचारदोन महिन्यांपासून लॉकडाऊन असले तरी जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत नशीब आजमाविणाऱ्या काहींनी या काळातही आपला प्रचार मोबाईलद्वारे सुरू ठेवला आहे. काही उमेदवार दररोज कधी थेट मतदाराला तर कधी मतदारांचा समूह सांभाळणाºया नेत्याला संपर्क करतात. काहींनी प्रत्यक्ष गावात जाऊन मतदारांच्या भेटी-गाठी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही गावात या उमेदवारांना एन्ट्रीच रोखली गेली, लॉकडाऊन संपल्यानंतर प्रचाराला या असा प्रेमाचा सल्लाही दिला गेला. ग्रामीण भागात काही प्रमाणात प्रचार होत असला तरी शहरी भागात बँकेच्या या उमेदवारांना शून्य प्रतिसाद आहे. कारण शहरात मतदार घराचे दार तर दूर फाटकही उघडत नसल्याचा अनुभव काहींना आला. मोबाईलवर प्रचार मात्र सुरू आहे.१० जूनपर्यंत मतदान होण्याचा अंदाजकोरोना संसर्गाच्या भीतीने शासनाने जाहीर केलेला चौथा लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर लॉकडाऊन वाढण्याची चिन्हे नाहीत. ते पाहता १० जूनपर्यंत निवडणुकीचा उर्वरित कार्यक्रम जारी होऊन तो पूर्ण केला जाईल, असा संचालकांचा अंदाज आहे. मतदानाच्या दोन दिवसपूर्वीच निवडणूक प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे आता जास्तीत जास्त पाच-सहा दिवसांचा अवधी मतदानापूर्वी मिळू शकतो अशी शक्यताही वर्तविली जात आहे. १० जून दरम्यान मतदान घेतले गेल्यास पालकमंत्र्यांचे प्रशासक नेमण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :bankबँकguardian ministerपालक मंत्री