शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच

By admin | Updated: July 17, 2016 00:37 IST

मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

भाजपाला हवे यवतमाळ : शिवसेनेचा आग्रह नांदेडसाठी यवतमाळ : मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत यवतमाळचे पालकमंत्रीपद हवे आहे. शिवसेनेपुढे वाशिमचा पर्याय ठेवण्यात आला असला तरी सेनेने नांदेड या मोठ्या जिल्ह्यासाठी आग्रह धरला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मदन येरावार यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यांच्याकडे ऊर्जा, बांधकाम, सामान्य प्रशासन, पर्यटन या सारखे महत्वाचे खाते दिले गेले. मुळात त्यांना कॅबिनेट दिले जाणार होते. परंतु जानकर यांनी अखेरपर्यंत कॅबिनेटचा हट्ट न सोडल्याने येरावारांचे कॅबिनेट त्यांना देण्यात आले. येरावारांना राज्यमंत्रीपद दिले असले तरी त्यांच्याकडे हेवीवेट खाते देऊन त्यांना कॅबिनेट न दिली गेल्याची कसर दूर करण्यात आली. आता राहिलेली कसर ही येरावार यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन दूर केली जावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. जिल्ह्यात भाजपाचे सात पैकी पाच आमदार असल्याने येथील पालकमंत्रीपद भाजपाकडेच रहावे, ही पक्षाची मागणी आहे. जिल्ह्याचे पालकत्व येरावारांनाच मिळणार असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. तर इकडे शिवसेनेने आपले पालकमंत्रीपद जाऊ नये म्हणून मोर्चेबांधणी चालविली आहे. राजकीय गॉडफादर व सीएमओ कार्यालयामार्फत हे प्रयत्न सुरू असले तरी त्यात सेनेला कितपत यश येते याकडे नजरा लागल्या आहेत. यवतमाळचे पालकमंत्रीपद गेल्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे शेजारील वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची राजकीय गोटातील माहिती आहे. परंतु राठोड यांना वाशिम कोणत्याही परिस्थितीत नको आहे. त्याऐवजी त्यांनी राजकीयदृष्ट्या वजनदार व भौगोलिक दृष्टीने मोठ्या असलेल्या नांदेड जिल्ह्याचा पर्याय पुढे केला आहे. नांदेड हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांचा गृहजिल्हा आहे. त्यामुळे संजय राठोड यांना नांदेडमध्ये पाठवून काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना पाहण्याची भाजपातील अनेकांची मनिषा आहे. इकडे संजय राठोड यांच्याकडे वाशिमची जबाबदारी आल्यास ते लोकसभेच्या दृष्टीने बांधणी करण्याची व तेथे त्यांचा वेगळा गट तयार होण्याची हूरहूर सेनेतील एका गटात पाहायला मिळते. एकूणच पालकमंत्री पदाच्या मदन येरावार व संजय राठोड यांच्यातील स्पर्धेत नेमके कोण विजयी होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) रस्ते-इमारतींसाठी भाजपाचा जोर ना.मदन येरावार यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आहे. मुळात भाजपाला येरावारांकडे सार्वजनिक बांधकाममधील रस्ते व इमारती हे खाते मिळणे अपेक्षित होते. रस्ते महामंडळ मिळाल्याने येरावार समर्थकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. म्हणूनच रस्ते व इमारती हे बांधकाम खाते यवतमाळकडे खेचता येऊ शकते का या दृष्टीने भाजपा चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. सध्या हे खाते अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे आहे. पोटेंकडील बांधकामची जबाबदारी येरावारांकडे तर येरावारांकडील बांधकाम पोटेंकडे जाणार असल्याची चर्चा अमरावतीच्या मुख्य अभियंता कार्यालयात ऐकायला मिळाली.