शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

कर्जमाफीच्या ‘जीआर’ची होळी

By admin | Updated: June 30, 2017 02:07 IST

शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या निकषानुसार जिल्ह्यातील एकूण ४ लाख १७ हजार शेतकऱ्यांपैकी

शासनाचा धिक्कार : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती आक्रमकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या निकषानुसार जिल्ह्यातील एकूण ४ लाख १७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल २ लाख ४० हजारपेक्षाही अधिक शेतकरी माफीला मुकणार आहेत. त्यामुळे शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीतर्फे गुरुवारी राज्य शासनाचा निषेध करून शासन निर्णयाची होळी करण्यात आली.समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह परिसरातील वसंतराव नाईक चौकात हे आंदोलन करण्यात आले. जीआरमध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना दोन जबर फटके देण्यात आले. त्यात २०१२ पूर्वीचे थकबाकीदार वगळण्यात आले. तसेच ३० जून २०१६ ला पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे यावेळी शासनाचा धिक्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेपुढे जीआरची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, शैलेश इंगोले, प्रदीप डंभारे, दादाराव डोंगरे, अशोक भुतडा, चंद्रकांत अलोणे, चंदू गायकी, यशवंत होले, एजाज जोश आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी राहणार वंचितजिल्हा बँकेचे ९० हजार तर राष्ट्रीयकृत बँकांचे ४२ हजार असे जिल्ह्यातील एकूण १ लाख ३२ हजार शेतकरी २०१२ पूर्वीचे थकबाकीदार आहेत. तसेच ३० जून २०१६ रोजी ज्यांचे कर्ज पुनर्गठण झाले, असे जिल्हा बँकेचे २४ हजार ११६ तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांचे ४५ हजार ४५० असे एकूण ६९ हजार ५६६ शेतकरी सभासद आहेत. शिवाय मागील वर्षी ज्यांनी पुनर्गठणाचा लाभ घेतला नाही, पण अद्यापही जे कर्ज भरू शकले नाही, असे जिल्हा बँकेचे २३ हजार ९७९ आणि राष्ट्रीयकृत बँकांचे १४ हजार ७०२ असे एकूण ३८ हजार ६८१ शेतकरी आहेत. जिल्ह्यातील असे एकंदर २ लाख ४० हजार ४४७ शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. शिवाय, २०१२ ते २०१६ दरम्यान थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांपैकी नोकरी असलेले, आयकर भरणारे, लोकप्रतिनिधी असलेले शेतकरी वगळले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल अडीच लाखावर शेतकरी कर्जमाफीला मुकणार असल्याचे शेतकरी हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.