शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

सहा हजार हेक्टरवरील पीक झाले भुईसपाट

By admin | Updated: February 8, 2016 02:38 IST

वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे.

यवतमाळ : वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे. यवतमाळ वन विभागात आतापर्यंत दोन हजार ८४५ हेक्टरवरील उभे पीक नष्ट केले आहे. गत पाच वर्षातील हे सर्वात मोठे नुुकसान आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे हे प्रमाण ६ हजार हेक्टरवर आहे. अवैध वृक्षतोडीने वनसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन्यप्राण्यांनी गाव आणि शेतशिवाराकडे धाव घेतली. यातून शेतीचे गणित बिघडले आहे. वन्यप्राण्याच्या दहशतीने शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.किडीचे आक्रमण, अवेळी आलेला पाऊस आणि वातावरणाच्या बदलापाठोपाठ वन्यप्राण्याच्या हल्ल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याचा अल्प मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ही रक्कम पिकांचे नुकसानही भरून काढू शकत नाही. पिकांच्या नुकसानीपोटी वनविभाग शेतक ऱ्यांना १००० रूपयापासून १० हजारापर्यंत मदत देणार आहे. नुकसान ८० टक्के असल्यास २५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र वनविभागाने पंचनामे करून १००० ते १५०० रूपयांच्याच मदतीची शिफारस केली आहे. यातून बियाण्याचा खर्च निघणे कठीण झाले आहे. (शहर वार्ताहर)जंगलालाच कुंपण करण्याची मागणीरोही, रानडुक्कर, कोल्हे, हरीण यासह विविध वन्यप्राण्यांनी शेतातील उभे पीक नष्ट करण्यास सुरूवात केली. हे प्राणी शेतशिवारात शिरू नये म्हणून जंगलालाच कुंपण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र हा खर्च न परवडणार आहे. यामुळे वनविभागाने या पर्यायाला नकार दिला आहे. असा आहे जिल्ह्याचा अहवालवन्यप्राण्याच्या धुमाकुुळाने २०१० मध्ये ३९८८ हेक्टरचे नुकसान केले. २०११ मध्ये ४४१४ हेक्टर, २०१२ मध्ये ५८७ हेक्टर, २०१३ मध्ये ८७३ हेक्टर, २०१४ मध्ये ५४६ हेक्टर, २०१५ मध्ये यवतमाळ वनवृत्त २८४६ हेक्टर, जिल्हा क्षेत्र ६००० हेक्टर आहे. वन्यप्राण्याने ४६ जनावरांची शिकार केली. या हल्ल्यात एका इसमाचा बळी गेला.