शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे

By admin | Updated: February 3, 2017 02:14 IST

भुईमुगाचे बियाणे सर्वाधिक महागडे आहे. यामुळे भुईमूग पेरणीचे क्षेत्र घटले. त्यात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांनी बियाण्याची निर्मिती करावी म्हणून महाबिज कंपनी पुढे आली आहे.

खर्च महाबीज उचलणार : पाच हजार क्विंटल पुरवठा, ५० ते १५० शेतकरी गटरूपेश उत्तरवार  यवतमाळभुईमुगाचे बियाणे सर्वाधिक महागडे आहे. यामुळे भुईमूग पेरणीचे क्षेत्र घटले. त्यात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांनी बियाण्याची निर्मिती करावी म्हणून महाबिज कंपनी पुढे आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदानावर बियाणे मिळणार आहे. याकरिता पाच हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबिजने राज्याकडे वळता केला आहे. भुईमूग बियाण्याचे सरासरी १० ते १२ हजार रूपये क्विंटल असे दर आहेत. यामुळे २० किलोची बॅग २२०० ते २४०० रूपयांना शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहे. एका एकराला साधारणत: ५० किलो बियाणे लागते. यामुळे शेतकरी ओलिताची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणीच लागवड करतो. त्याकरिता प्रथमत: आर्थिक तरतुदीचा विचार करतो. या स्थितीत महाबिज कंपनी पुढे आली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्याची निर्मिती करावी आणि इतर शेतकऱ्यांना पुढल्या वर्षी बियाणे द्यावे म्हणून ६० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध केले आहे. याकरिता काही अटी आहे. एका गावामध्ये किमान ५० ते १५० शेतकऱ्यांनी या बियाण्याची लागवड करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी असे शेतकरी एकत्र येतील, अशांना हे बियाणे दिले जाणार आहे.एका शेतकऱ्याला किमान दोन बॅग बियाणे मिळणार आहे. ९६० रूपयांत एक बॅग याप्रमाणे १९०० रूपयांत दोन बॅग शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्याचे परमीट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सर्वच शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. पाच हजार क्विंटल बियाणे राज्याकडे वळते करण्यात आले आहे. अनुदानावर बियाणे मिळत असल्याने भुईमुगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.