शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचन वाढल्यास पाण्याची मोठी बचत

By admin | Updated: February 5, 2016 01:54 IST

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल.

प्रल्हादराव जगताप : वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्पयवतमाळ : पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल. खानापूरकर पॅटर्न, बॅरेजेस हेसुद्धा मोठ्या धरणांना सक्षम पर्याय आहे. राज्य व केंद्र सरकारने अशाच पद्धतीने जलसंचय करून भूजलसाठा वाढवावा. शेतकऱ्यांना धरणाची गरज नाही, मात्र पाण्याची आहे, असे मत धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील यांनी व्यक्त केले. येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प त्यांनी गुंफले. प्रल्हादराव जगताप पुढे म्हणाले, ९५ गावाची हजारो हेक्टर सुपिक जमीन, एक हजार हेक्टर जैव विविधतेने समृद्ध जंगल पाण्याखाली घालून राजकारणातील काही मंडळी निम्न पैनगंगा प्रकल्पाची समर्थक बनली आहे. जीव देवू मात्र धरणासाठी जमीन देणार नाही आणि धरणही होवू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला. मोठी धरणे म्हणजे राजकारण्यांचे खाऊगिरीचे अड्डे झाले आहेत. निम्न पैनगंगाबाबत तर उद्घाटनापूर्वीच काम सुरू करण्याचा अफलातून प्रकार केला गेला. विस्थापितांमध्ये पद्धतशीर फूट पाडण्याचा धरण समर्थकांचा डावही संघर्ष समितीने हाणून पाडला. आज बुडित क्षेत्रातील ९५ टक्के लोक धरण विरोधक आहे. शासनाने खंबाळा प्रकरणात शेकडो लोकांवर खटले दाखल केलेले असले तरी आमची एकजूट अभेद्य असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. येरावार, गावंडे गुरुजी आदी सहकाऱ्यांचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. व्याख्यानमालेतर्फे यावर्षीपासून शेतकरी चळवळीचे प्रणेते शरद जोशी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘योद्धा शेतकरी’ पुरस्कार दिला जात आहे. पहिल्या वर्षी हा पुरस्कार निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याचे १८ वर्ष नेतृत्त्व करणारे प्रल्हादराव जगताप पाटील यांना प्रदान करण्यात आला. माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, अप्पासाहेब वानखेडे, गजाभाऊ खर्चे, प्रा. रमाकांत कोलते यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये देवून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांतर्फे आपण हा पुरस्कार स्वीकारत असून मिळालेली रक्कम चळवळीसाठी देत असल्याचे प्रल्हादराव जगताप यांनी यावेळी जाहीर केले. संचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी, तर आभार प्रा. सीमा शेटे यांनी मानले. (वार्ताहर)