ग्रामपंचायतीचा पुढाकार : जिल्हा परिषद अध्यक्ष, सीईओंनी हाती घेतला झाडूबोरीअरब : संत गाडगेबाबा महास्वच्छता अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ बोरीअरब येथून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे आणि सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांनी स्वत: हाती झाडू घेऊन स्वच्छता केली.बोरीअरब ग्रामपंचायत व साई दुर्गोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला व संत गाडेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. ग्रामपंचायतमध्ये गप्पी मासे उत्पत्ती केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी व बोरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवाकांसह प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे , सभापती सुभाष ठोकळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सरपंच ममता लढ्ढा यांच्यासह सर्व मान्यवरांनी हातात झाडू घेऊन गावात साफसफाई केली. यानंतर साई दुर्गोत्सव मंडळात उपस्थित शाळकरी विद्यार्थी व गावकऱ्यांना मार्गदर्शन करुन जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सभापती सुभाष ठोकळ, जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, दारव्हा पंचायत समिती उपसभापती सुषमा गावंडे, गटविकास अधिकारी भाऊसाहेब गृहे, सरपंच ममता लढ्ढा, वैद्यकीय अधिकारी वसुधा डेहणकर, विस्तार अधिकारी शांताराम सरगर, उपसरपंच शंकर जयस्वाल, ओमप्रकाश लढ्ढा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच ममता लढ्ढा यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य विनोद कावरे, रंजित काकडे, शंकर चव्हाण, आशीष देशमुख, हेमलता इलमे, सुषमा तिवारी, प्रमिला दुधे, कोंडाबाई तायडे, राधाबाई अमोलकर, मंदाबाई खंडारे, पार्वताबाई वारेकर, ग्रामविकास अधिकारी डी. बी. गावंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व गावकऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. (वार्ताहर)
बोरीअरब येथे महास्वच्छता अभियान
By admin | Updated: October 24, 2015 02:31 IST