शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने आजी व नात ठार

By admin | Updated: July 20, 2016 01:49 IST

गावानजीकच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजी व नातीचा जीवंत वीज ताराच्या स्पर्शाने मृत्यू झाला तर मुलगा

दहागावची घटना : नाल्यावर तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श, मुलगा गंभीर उमरखेड : गावानजीकच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजी व नातीचा जीवंत वीज ताराच्या स्पर्शाने मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता घडली. पंचफुला रामराव जाधव (५५), समीक्षा रंगराव जाधव (१०) असे मृत आजी आणि नातीचे नाव आहे. तर रंगराव रामराव जाधव (३२) असे गंभीर जखमीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता पंचफुलाबाई नात समीक्षासह गावालगत असलेल्या लोणाडी नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या. त्यावेळी तुटलेल्या जीवंत वीज ताराचा स्पर्श पंचफुलाबाई आणि समीक्षाला विजेचा जबर धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार नाल्यावर असलेल्या महिलांना दिसला. त्यांनी हा प्रकार गावात जाऊन सांगितला. त्यावेळी पंचफुलाचा मुलगा रंगराव धावत आला. त्याने या दोघींना उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही जबर धक्का बसला. गावकऱ्यांनी या तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पंचफुला व समीक्षाला डॉक्टरांंनी मृत घोषित केले. तर बेशुद्धावस्थेत असलेल्या रंगरावला उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या वीज तारा तुटलेल्या होत्या. वीज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रारही करण्यात आली होती. परंतु दखल घेतली गेली नाही. परिणामी आज दोघांचा बळी गेला. या प्रकरणाला वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप करीत उमरखेड पोलीस ठाण्यात मारोतराव जाधव यांनी तक्रार दाखल केली. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान गावकऱ्यांनी वीज वितरणवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. माजी आमदार विजय खडसे यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निवळला. (शहर प्रतिनिधी)सणाच्या दिवशी चुल पेटलीच नाही ४वर्षातील पहिला सण आखाडी मंगळवारी असून याच दिवशी गावात भीषण घटना घडली. त्यामुळे गावात कुणाच्याही घरी चुल पेटली नाही. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. समीक्षा ही गावातील शाळेत चौथ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी होती. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.