शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
3
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
4
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
5
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
6
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
7
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
8
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
9
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
10
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
11
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
12
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
13
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
14
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
15
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
16
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
17
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
18
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
19
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
20
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

ग्रामपंचायत सदस्याची पोलीस ठाण्याच्या टॉवरवर ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:43 IST

ठाणेदाराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला, मारहाण केली, असे सांगत एका ग्रामपंचायत सदस्याने गुरुवारी सकाळी दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून गळ्यात फास अडकवित वीरूगिरी केली. त्याच्या या चार तासाच्या शोले आंदोलनाने उपस्थितांचे मनोरंजन झाले.

ठळक मुद्देलाडखेड : पोलिसांवर मारहाणीचा आरोप, एसडीपीओंची मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ठाणेदाराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला, मारहाण केली, असे सांगत एका ग्रामपंचायत सदस्याने गुरुवारी सकाळी दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून गळ्यात फास अडकवित वीरूगिरी केली. त्याच्या या चार तासाच्या शोले आंदोलनाने उपस्थितांचे मनोरंजन झाले. त्याचवेळी लाडखेड पोलिसांची पाचावरधारण बसली होती. एसडीपीओंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वीरू खाली उतरला आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.श्रावण धुमा राठोड (४०) रा.चाणी ता. दारव्हा असे या वीरूचे नाव आहे. तो ग्रामपंचायत सदस्य आहे. २६ आॅगस्ट रोजी गावातच मारहाणीचे प्र्रकरण घडले. त्यात पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक आपल्याला गोवल्याचा व ठाण्यात मारहाण केल्याचा श्रावणचा आरोप आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी करीत तो लाडखेड पोलीस ठाण्याच्या आवारातील टॉवरवर सकाळी चढला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने हा प्रकार उघडकीस आला. दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्यास आपण येथेच गळफास घेऊ, असा इशारा त्याने दिला. प्रकरणाची माहिती मिळताच ठाणेदार सारंग मिराशी तेथे दाखल झाले. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक, अग्नीशमन दल तैनात करण्यात आले होते. श्रावणला अनेकांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यर्थ ठरला. चार तास होऊनही तो खाली उतरत नसल्याचे पाहून दारव्हा एसडीपीओ नीलेश पांडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याला निष्पक्ष चौकशीची ग्वाही दिली. त्यानंतर तो खाली उतरला. त्याला यवतमाळात आणून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.या शोले स्टाईल आंदोलनाची मात्र दिवसभर चर्चा होती. टॉवरला संरक्षक कूंपन असूनही श्रावण त्यावर चढला कसा असावा याची चर्चा घटनास्थळी होती. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे