शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये मुंडण करून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:55 IST

पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली. गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे.

ठळक मुद्देपैनगंगेतील आंदोलनाचा तेरावा दिवस : नदीपात्रातच तेरवीचे जेवण, शासन-प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली.गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे. शनिवारी हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिराजदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तीन दिवसात पिण्यासाठी नदीत पाणी सोडण्यात येईल असे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी स्वत: भेट देऊन लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली.यानंतर आंदोलनाचा १३ वा दिवस असल्यामुळे शासन व प्रशासनाचा निषेध करून शेतकºयांनी मुंडन करून शासनाची तेरवी केली. यात उत्तमराव देवकते, अजब माने, श्रीराम वानखेडे, पांडुरंग कदम, राजू पतंगे, नारायण बेंद्रे, पुंजाराम वानखेडे, काशिनाथ वानखेडे आदींसह १३ शेतकऱ्यांनी मुंडन केले. त्यानंतर तेरवीचे भोजनही देण्यात आले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडलेले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.९० गावांतील शेतकरीगेल्या १३ दिवसापासून नदी काठावरील विदर्भ आणि मराठवाड्यातील ९० गावांतील शेतकरी, नागरिक धरणे आंदोलन करीत आहे. मात्र शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे शासनाची तेरवी करून शासनाचा निषेध म्हणून तेरवीचे भोजन करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाला जागे करण्यासाठी सर्व नागरिकांनी संघटितपणे लढा लढणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला.