शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वाहने जीर्ण

By admin | Updated: January 25, 2015 23:29 IST

शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने आता जीर्ण झाली अहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़

वणी : शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील जुनी शासकीय वाहने आता जीर्ण झाली अहे. ही वाहने आता भंगारात जमा झाली आहे़येथील पाटबंधारे विभाग, तहसील, पोलीस ठाणे, आरोग्य विभाग आदी शासकीय कार्यालयांत जुनी शासकीय वाहने पडून आहेत़ ही वाहने आता अतिशय जीर्ण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहने एकाच ठिकाणी उभी दिसत आहे़ अधिकाऱ्यांना तालुका ठिकाणी दौरा करण्यासाठी व इतर शासकीय कामांकरिता शहरातील बहुतांश कार्यालयात शासनाने वाहने उपलब्ध करून दिली आहे़ या जुन्या वाहनांची मर्यादा संपल्याने आता शासनाने नवीन वाहने अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे़ त्यामुळे जुनी वाहने आता अतिशय जीर्ण होऊन भंगारात जमा झाली अहे. या वाहनांकडे कुणाचेही लक्ष जात नसून अनेक वाहने कार्यालयाच्या मागील बाजून एखाद्या झाडाखाली धूळखात पडून आहे़येभील पाटबंधारे कार्यालयातील वाहन एका झाडाखाली ठेवण्यात आले आहे़ ते वाहन अतिशय जीर्ण झाले आहे. त्यावर प्रचंड धूळ साचून आहे़ त्याचबरोबर वाहनाच्या आजूबाजूला झाडाझुडूपाने वेढाही दिला आहे़ त्यामुळे त्या वाहनाकडे कुणीच ढुंकूनही पाहत नाही़ या वाहनाकडे कुणाचे लक्ष जात नसल्याने वाहनांच्या सुट्या भागावर चोरटे डल्ला मारण्याची शक्यता बळावली आहे.इतर विभागांतही जुनी वाहने पडून आहेत. त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. अद्याप अशा वाहनांचा लिलावही झाला नाही. त्यामुळे हजारो, लाखो रुपये किमतीची ही वाहने धूळखात पडून आहे. किमान त्यांचा लिलाव करण्याची गरज आहे. त्या लिलावातून काही प्रमाणात पैसे वसूल होण्याची शक्यता आहे. हाच पैसा दुसऱ्या उपयोगी पडू शकतो. शेवटी या वाहनांच्या खरेदीसाठी खर्च झालेला पैसा जनतेच्या खिशातूनच गेला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांची काळजी घेण्यासाठी तरी किमान लिलावातून काही रक्कम परत मिळविण्यासाठी हालचाल करणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)