शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज आरक्षणासाठी सरकारला अल्टीमेटम

By admin | Updated: December 13, 2015 02:39 IST

भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला घटनादत्त अधिकार मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

पत्रपरिषद : धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीचा इशारायवतमाळ : भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला घटनादत्त अधिकार मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीतच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असे खुद्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांनी अद्यापही याची पूर्तता केली नाही. या शासनाला डिसेंबर २०१६ च्या हिवाळी अधिवेशनापर्यंत आरक्षणासाठी अल्टीमेटम दिला असल्याचे धनगर समाज आरक्षण समितीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप धवने यांनी पत्रपरिषदेत सांगितले.राज्यघटनेत अनुसूचित जमातीसंदर्भात निर्देशित केलेल्या कलम ३६ मध्ये धनगड या जातीचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात धनगडचा अपभ्रंश होवून धनगर झाला आहे. केवळ या एका कारणासाठी ६८ वर्षांपासून धनगर समाज घटनादत्त अधिकारापासून वंचित राहिला आहे. यासाठी धनगर समाज संघर्ष समितीने संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले होते. निवडणूकपूर्व काळात विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी धनगरांना अनुसूचित जमातीचा अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला एक वर्षाचा कार्यकाळ कामासाठी लागतो म्हणून संघर्ष समितीने फार तगादा लावला नाही. मात्र आता एक वर्ष लोटूनही शासनकर्ते टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशॉलॉजीकडून आरक्षणाबाबत पडताळणी केल्यानंतरच निर्णय घेण्याची भाषा करत आहे. धनगर हाच धनगड असल्याचे भक्कम पुरावे उपलब्ध आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल, ग्रामपंचायत अधिनियमामध्ये अनुसूचित जमाती नसलेला धनगरांचा नामोल्लेख हे पुरावे भक्कम आहे. त्यानंतरही पडताळणीची औपचारिक अट शासनाने टाकली आहे. भाजप व शिवसेनेलाच धनगर समाजाने संपूर्ण राज्यात भरघोस मतदान केले. त्यामुळे त्यांची सत्ता आली. राज्यात एक कोटी ४० लाख इतकी धनगरांची लोकसंख्या आहे. शासनाने दिलेला शब्द पाळला नाहीतर धनगर समाज पुढच्या निवडणुकीत युती सरकारला आपली ताकद दाखवून देईल, असाही इशारा यावेळी समितीच्या सदस्यांनी दिला. पत्रपरिषदेला डॉ.संदीप धवने, पांडुरंग खांदवे, अविनाश जानकर, मधुकर चिव्हाणे, कृष्णराव कांबळे, विठ्ठलराव पुच्चे, गजानन मसाळे, योगेश कमनर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)