शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाळू शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:52 IST

कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू : दाभडी येथून प्रहारच्या आसुड यात्रेला सुरूवात, आर्णी शहरात रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या दानवाला मानव करण्यासाठी यात्रेच्या समारोपाला भोकरदनमध्ये सर्वांनी यावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवारी दाभडी येथून आसुड यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी आमदार बच्चू कडू बोलत होते. यापूर्वीच्या शासनानेही शेतकऱ्यांची लूटच केली. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग आणला, पण तो पूर्ण लागू केला नाही. त्यामुळे आजचे आणि मागचे दोन्ही सरकार सारखेच आहे. शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतमालाला भाव दिला पाहिजे. पण आज उसाचा भाव कमी करून पाकिस्तानातून साखर आयात करण्याचे उफराटे धोरण राबविले जात आहे. लोकांना रोजगार नाही. पोटावर लाथ मारली जात आहे. पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही अन् दुसरीकडे शौचालय बांधण्यास सांगितले जात आहे, अशी टीका आमदार कडू यांनी केली.नोटाबंदी करून देशाचा फायदा झाला नाही. उलट भाजपाच्याच नेत्यांनी यातून मोठा पैसा जमवला. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याकडे आजही दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे ‘वोटिंग’ करताना आता विचार केला पाहिजे. यांचे ‘सेटिंग’ उधळत शेतकरी विचाराचे आमदार सभागृहात पाठवावे लागतील. आज तेथे मी एकटा आहे. माझ्यासोबत अजून काही आमदार हवे. त्यासाठीच आसुड यात्रेतून जनजागृती करणार असल्याचे आमदार कडू म्हणाले. काही लोक मुंबईत बसूनच बोलतात. आम्ही थेट मोदींच्या गावात जाऊन आलो. जिथे जखम आहे, तिथेच इंजेक्शन देण्याचे काम प्रहारकडून होईल, असेही ते म्हणाले.नरेंद्र मोदींनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांना स्वप्न दाखविले. तरीही शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. दाभडी दत्तक घेऊन विकास करण्याच्या घोषणा आमदार, खासदारांनी केल्या. पण गावात काहीच फरक पडला नाही. प्रहारने शेतकरी, शेतमजुरांना नेहमीच मदत केली. यापुढेही दाभडी गाव आम्ही दत्तक घेऊन समस्या मार्गी लावणार आहोत, अशी घोषणा यावेळी प्रहारचे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी केली.यावेळी प्रहारच्या पांढरवडाच्या नगराध्यक्ष वैशाली नहाते, कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, जिल्हाध्यक्ष विलास पवार, नितीन मिर्झापुरे, शिक्षक आघाडीचे सुभाष कुळसंगे, तालुकाध्यक्ष नीलेश आचमवार, शहराध्यक्ष अंकुश राजूरकर, श्रीकांत काळे यांच्यासह राज्यभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते.स्थानिक आमदार ‘ठुमक्यात’ मग्नआसुड यात्रेची सुरवात करताना दाभडी गावातील शेतकऱ्यांनीही आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आपल्या भावना व्यक्त केल्या. दिगांबर गुल्हाने हे शेतकरी म्हणाले, स्थानिक आमदार शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रश्नांकडे लक्ष देत नाही. उलट ते ‘ठुमके’ लावण्यातच मग्न आहेत. नरेंद्र मोदींनी आमच्या गावात येऊन आश्वासन दिले. आज मात्र कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यावेळी दाभडी गावातील रूख्मिणी विठ्ठल राठोड या शेतकरी महिलेच्या कुटुंबाला प्रहारकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर शेतकऱ्यांचे ‘काळे दिन’ अजून गेले नाही, म्हणून आपण काळा शर्ट घालून आलो, अशी टीप्पणी आमदार कडू यांनी केली.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू