शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी

By admin | Updated: July 3, 2014 23:48 IST

राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी

यवतमाळ : राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आज दमडीही शिल्लक नाही, तेंव्हा शासनाने ही परिस्थिती समजून घेऊन शेतकऱ्यांना भरीव मागणी करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रांमधले तब्बल तीन नक्षत्र सताड कोरडे गेल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील समस्त बळीराजा हवालदिल झाला असून अस्मानी संकटाच्या साडेसातीत अडकला आहे. राज्यामध्ये सर्वत्र हीच परिस्थिती असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. शेतातील कोंब आलेली बियाणे जळून नष्ट झाली. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अश्रू कोरडे पडलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे अपेक्षेची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे फार मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट मोफत बियाणे देऊन किंवा दुबार पेरणीसाठी भरीव आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा व त्यांच्यावरचे संकट तत्काळ दूर करावे, अशी महत्वपूर्ण मागणी यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. पावसाळा लांबणीवर पडला असल्याने केवळ शेतकरीच अडचणीत नसून हे एक सामाजिक संकट आहे. त्यामुळे याकरिता सरकारने पुढाकार घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात एकटे न सोडता भरीव मदत त्वरित जाहीर करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा आहे. या बाबत नुकतीच यवतमाळ जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राज्य सरकारकडे रवाना करण्यात आले असून सर्व स्तरातील नागरिकांनीसुद्धा याबाबत जागृत राहून शेतकऱ्यांसाठी भरीव मागणी करण्याचे आवाहन सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बुटे, अध्यक्ष मंगेश वैद्य, श्रीरंग रेकलवार, एम.एम. गुल्हाने, किशोर पोहणकर आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)