शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जावयांनो, एसी जपून वापरा; शासन काकुळतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जनसेवेसाठी ‘मान मोडून’ काम करणारे सरकारी कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसले आहेत. पण ते बसले आहेत, एसीच्या गारेगार हवेत वीजेचा अपव्यय करीत. अखेर या कर्मचाऱ्यांना एसीची हवा आवरा, असे सांगण्यासाठी राज्य शासनाला चक्क जीआर निर्गमित करावा लागला आहे.महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील बहुतांश कार्यालयांमध्ये वातानुकलन ...

ठळक मुद्देबेलगाम वीज वापरावर आळा घालण्यासाठी जीआर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जनसेवेसाठी ‘मान मोडून’ काम करणारे सरकारी कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसले आहेत. पण ते बसले आहेत, एसीच्या गारेगार हवेत वीजेचा अपव्यय करीत. अखेर या कर्मचाऱ्यांना एसीची हवा आवरा, असे सांगण्यासाठी राज्य शासनाला चक्क जीआर निर्गमित करावा लागला आहे.महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील बहुतांश कार्यालयांमध्ये वातानुकलन यंत्रणेचा (एसी) वापर होतो. ही सरकारी संपत्ती आहे, असे मानून कर्मचारी-अधिकारी त्याच्या वीज वापरावर फारसे लक्ष देत नाहीत. गरज नसतानाही एसीचे तापमान कमी जास्त केले जाते. मात्र, एसी चालविण्याची विशिष्ट पद्धती आहे.बहुतांश कार्यालयांमध्ये एसी १८ ते २० डिग्री सेल्सीअस तापमानावर चालविला जातो, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर होत आहे. तोच एसी २४ डिग्री सेल्सीअस तापमानावर ठेवल्यास विजेची २४ टक्के बचत होऊ शकते, असे निरीक्षण केंद्र सरकारच्या ब्युरो आॅफ एनर्जी एफिशिअन्सीद्वारे नोंदविण्यात आले आहे. हेच तापमान मानवी शरीराला आवश्यक आर्द्रता आणि योग्य हवेच्या अभिसरणाकरिता सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बाहेरून कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींना तापमानातील विषम बदलांना सामारे जावे लागत नाही.या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, विश्रामगृहांमधील एसीचे तापमान २४ डिग्रीच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यासन अधिकारी सं. मु. उत्तरवार यांच्या स्वाक्षरीने हा जीआर शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. शासकीय कार्यालयांसाठी जरी आदेश दिलेला असला, तरी सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्या घरातील, दुकानांतील, कार्यालयांतील एसी जपून वापरल्यास बेलगाम वीज वापरावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Governmentसरकार