शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

महसूल भवनात येणार शासकीय कार्यालये

By admin | Updated: June 21, 2015 00:06 IST

महसूल कर्मचारी संघटनेचे विश्रामगृह, पतसंस्था कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महसूल भवनाचा जिल्हा ....

स्थानांतरण : कर्मचारी संघटनेच्या इमारतीचा ताबा यवतमाळ : महसूल कर्मचारी संघटनेचे विश्रामगृह, पतसंस्था कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महसूल भवनाचा जिल्हा प्रशासनाने ताबा घेतला असून तेथे पुढील आठवड्यात दोन शासकीय कार्यालये स्थलांतरित केली जाणार आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कोर्टासमोरील महसूल भवनावर लक्ष केंद्रीत केले. कर्मचारी संघटनेच्या आडोश्याने चालणाऱ्या व्यवहारांना चाप बसविला. एवढेच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले. अटकेच्य भीतीने अनेक दिवस गावाबाहेर राहिलेले हे पदाधिकारी उच्च न्यायालयातून अंतरित जामीन मंजूर होताच पुन्हा गावात परतले आहेत. इकडे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा फास आणखी आवळण्यास सुरुवात केली आहे. १ कोटी ३० लाख रुपयांच्या व्यवहारासह अन्य काही प्रकरणांची सखोल चौकशी केली जाणार आहे. विश्राम भवन म्हणून वापरलेल्या महसूल भवनातील व्यवहारांची संपूर्ण वसुली केली जाणार आहे.एवढेच नव्हे तर ही इमारत प्रशासन ताब्यात घेणार आहे. या आलिशान इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीतील दोन विभाग स्थलांतरित करून थाटले जाणार आहेत. या इमारतीत आतापर्यंत अनेक अधिकारी विश्राम करीत होते. त्यापोटी शुल्कही संघटनेकडून वसूल केले जात होते. (जिल्हा प्रतिनिधी)१ कोटी ३० लाखांचा हिशेब जुळविणारएरव्ही छुटपुट प्रकरणात संघटनेच्या बळावर गुरगुरणारे हे पदाधिकारी आता अभ्यासू प्रशासनापुढे ‘ब्र’सुद्धा काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल प्रशासनात थाटली जाणारी शासकीय कार्यालये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.पुढील किमान तीन वर्ष तरी प्रशासनाचाच या इमारतीवर ताबा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे.