शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालय परिसराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुरेंद्र पाल या शिकाऊ डॉक्टरचा खून झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मेडिकल चौक ते नंदूरकर महाविद्यालय या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यानंतर गुरुवारी पिंपळगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रुग्णालय ते नंदूरकर महाविद्यालय मार्गावरील अतिक्रमण हटविल्यानंतर गुरुवारी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पिंपळगाव रोडवरील अतिक्रमणावरही प्रशासनाने हातोडा घातला. अतिक्रमण हटविल्याने शासकीय रुग्णालयाने आता मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान ही मोहीम राबविताना दुजाभाव केला जात असल्याचीही अनेकांची भावना असल्याचे निवेदन गुरुवारी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.  दारव्हा नाका, दर्डानगरसह, शारदा चौक ते बसस्थानक, बसस्थानक ते आर्णी नाका, बसस्थानक ते दारव्हा नाका, रेल्वे क्राॅसिंग येथील अतिक्रमण कधी हटविणार असा प्रश्न उपस्थित केला. 

यवतमाळ : गुरुवारी सकाळपासूनच प्रशासनाने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पिंपळगाव रोडवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण हटविल्याने शासकीय रुग्णालयाने मोकळा श्वास घेतला. रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुरेंद्र पाल या शिकाऊ डॉक्टरचा खून झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मेडिकल चौक ते नंदूरकर महाविद्यालय या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यानंतर गुरुवारी पिंपळगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.  पथक दाखल झाल्यानंतर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. या मोहिमेमुळे या मार्गावर दिवसभर गोंधळाची स्थिती होती.   दरम्यान, ॲड. जयसिंह चव्हाण, ॲड. अजय डाखोरे, ॲड. नरेंद्र मेश्राम, ॲड. भारती मेश्राम, ॲड. ए. तगाले, किशोर भवते, गजानन वानखेडे, संदेश भगत, मधुकर पेंदाम, ॲड. एस. व्ही. आठवले, ॲड. सचिन बोबडे, ॲड. राम शेंडे यांच्यासह वकिलांनी गुरुवारी  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून प्रशासनाने अतिक्रमण हटविताना दुजाभाव करू नये, अशी मागणी   केली आहे. अतिक्रमण हटावची कारवाई करताना अनेक ठिकाणी दृश्यस्वरूपात असलेले अतिक्रमण काढण्यात येत नसल्याकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेध. या प्रकारामुळे गोरगरिबात  अस्वस्थता व अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. नियमानुसार सरसकट सर्वांचेच अतिक्रमण काढण्याची मागणी त्यांनी केली. 

शहरातील अनेक मार्ग अतिक्रमणाने केले गिळंकृत

- दारव्हा नाका दर्डानगर चौकापासून थेट लोहारापर्यंत असलेल्या महामार्गाला लागूनचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. या बरोबरच त्यावर हातगाडे, शोरूम, कार्यालये, कुंपण व दुकाने थाटण्यात आली आहेत. मेनलाईनमध्ये अस्थायी स्वरूपात उभे केलेले दुकानाचे अनेक शेड आहेत. यावरही कारवाई करण्याची गरज आहे. तीच परिस्थिती गोदणी मार्गावरील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरातील येथेही मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहे. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैशालीनगर ते जय विजय चौकापर्यंतही मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या जागेवर दुकाने व शेड थाटण्यात आली आहेत. रुग्णालय परिसरातील गोरगरिबांची अतिक्रमणे हटवितानाच या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप वकिलांनी निवेदनात केला आहे.

मेडिकल परिसरात डाॅक्टरचा खून झाला. यानंतर खुनाच्या प्रयत्नाची घटना घडली. यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अतिदक्षता म्हणून या ठिकाणावर कारवाई करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नाही. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल.      - माधुरी मडावी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, यवतमाळ. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण