शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय बांधकामांना भीषण टंचाईतही उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:26 IST

शहरात थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक व्याकूळ झाले असताना दुसरीकडे शासकीय बांधकामाला उधाण आले आहे. नगरपरिषद आणि बांधकाम विभागाने शहरात एप्रिल महिन्यात सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले आहे.

ठळक मुद्देकारभार नियंत्रणाबाहेर : सिमेंट रस्ते व नालीचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक व्याकूळ झाले असताना दुसरीकडे शासकीय बांधकामाला उधाण आले आहे. नगरपरिषद आणि बांधकाम विभागाने शहरात एप्रिल महिन्यात सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. पदाधिकारी आणि प्रशासनात ताळमेळ नसल्याने शहरात हा गोंधळ सुरू असून नागरिक मात्र या प्रकारावर संताप व्यक्त करीत आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिक रात्रंदिवस एक करीत आहे. अशा परिस्थितीत शहरात शासकीय बांधकाम सुरू असल्याचे दिसून येते. यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. शहरातील प्रभाग क्र. २५ मधील उज्वलनगर, कौसल भवन परिसरात नालीचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम आमदार विकास निधीतील असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते. नगरपरिषद बांधकाम विभागाने वाघापूर परिसरात सिमेंट रस्त्याचे काम हाती घेतले आहे. तसेच आर्णी रस्त्याचे चौपदरीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.एकीकडे रणरणत्या उन्हात महिला टँकरची प्रतीक्षा करीत आहे. तर दुसरीकडे बांधकामावर भरमसाठ पाण्याचा वापर करण्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाला मुबलक पाण्याची आवश्यकता असते. टंचाई काळात कामात दर्जा कसा राखला जाईल, याचेही सोयरसूतक बांधकाम विभागाला दिसत नाही. प्रशासनाने यवतमाळ शहर दुष्काळी क्षेत्र घोषित केले आहे. त्यामुळे बांधकामावर प्रतिबंध आले आहे. खासगी बांधकाम बंद करण्याची मागणी होत आहे. काही नगरसेवकांनी हा मुद्दा सर्वसाधारण सभेतही उपस्थित केला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद विभागाने पाणीटंचाईच्या काळातही बांधकाम सुरूच ठेवले आहे.कंत्राटदाराच्या मर्जीने कारभारविकास कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी ३१ मेपर्यंत खर्च करण्याची अखेरची संधी मिळाली आहे. मंजुरी व निविदा प्रक्रिया करून पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे. आता टंचाई काळात अखेरच्या क्षणी कंत्राटदाराच्या मर्जीने बांधकाम सुरू केले आहे. यामध्ये आमदार विकास निधीतील कामांचाही समावेश आहे. केवळ कंत्राटदाराच्या भल्यासाठी ऐन टंचाई काळात बांधकाम सुरू केल्याचा आरोप होत आहे.टंचाई काळात पाण्याची काटकसर करणे आवश्यक आहे. प्रभाग क्र. २५ मध्ये सुरू झालेले नाली बांधकाम आमदार विकास निधीतील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सदर काम आहे. तर वाघापूरमध्ये पालिकेच्या एका सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. निधी खर्चासाठी अंतिम मुदत मिळाल्याने काम थांबविणे शक्य झाले नाही. इतर १२ कोटी ५० लाखांचा निधी खर्चाला मुदतवाढ मिळविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.- प्रवीण प्रजापतीबांधकाम सभापती, नगरपरिषद यवतमाळ.