शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शासकीय मैदानातील दांडिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:22 IST

गेल्या दोन दिवसांपासून शासकीय मैदानावर आयोजित दांडियाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर जेसीआयने मोठ्या मनाने माघार घेतल्याने शुक्रवारी पडदा पडला. जेसीआयतर्फे हा दांडिया आता अन्य ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देखेळाडूंमध्ये समाधान : जेसीआयने घेतली मोठ्या मनाने माघार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या दोन दिवसांपासून शासकीय मैदानावर आयोजित दांडियाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर जेसीआयने मोठ्या मनाने माघार घेतल्याने शुक्रवारी पडदा पडला. जेसीआयतर्फे हा दांडिया आता अन्य ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. जेसीआयच्या या निर्णयामुळे या मैदानावर सराव करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नवरात्रोत्सवानिमित्त जेसीआयतर्फे गेल्या पाच वर्षांपासून वणी शहरात दांडियाचे आयोजन केले जाते. महिला व मुलांच्या सुरक्षितता व सोयीच्या दृष्टीने यावर्षी जेसीआयने शासकीय मैदानावर दांडिया आयोजित करण्याचे ठरविले. त्यानुसार सदर शासकीय मैदानावर दांडिया आयोजनासाठी परवानगी देण्याच्या मागणीचा अर्ज जेसीआयतर्फे तालुका क्रीडा अधिकाºयांकडे करण्यात आला होता. या अर्जावर आमदार बोदकुरवार यांनी सदर मैदान दांडियासाठी देण्याबाबत शिफारस केली होती. त्मात्र ही बाब या मैदानावर नियमीत सराव करणाºया खेळाडूंना कळल्यानंतर या खेळाडूंनी एकत्रितपणे शासकीय या दांडियाला विरोध केला. गुरूवारी शेकडो खेळाडूंनी आमदार बोदकुरवार यांच्या निवासस्थानी जाऊन आपली व्यथा मांडली होती. त्यावर खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन आमदार बोदकुरवार यांनी जेसीआयच्या पदाधिकाºयांना शासकीय मैदानाऐवजी अन्य ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्याबाबत सुचविले होते. पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वत:ही प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार बोदकुरवार यांनी दिले होते.पोलीस भरती, सैनिक भरतीसाठी तयारी करणारे शेकडो युवक दररोज शासकीय मैदानावर सराव करतात. मात्र दांडियाच्या आयोजनामुळे नऊ दिवस हे मैदान उपलब्ध राहणार नसल्याने खेळाडू अस्वस्थ झाले होते. जेसीआयच्या पदाधिकाºयांनी खेळाडुंची भूमिका समजून घेतली. त्यांच्या नियमित सरावाचा खोळंबा होऊ नये, यासाठी जेसीआयच्या पदाधिकाºयांनी एकत्र येऊन बैैठक घेतली. या बैठकीत सर्वानुमते अन्य ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.जेसीआय ही सामाजिक संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. या संघटनेकडून कुणालाही त्रास होऊ नये, ही आमची नेहमीच भूमिका राहीली आहे. शासकीय मैदानाच्या विषयातही आम्ही तिच भूमिका ठेवली, असे जेसीआयचे संस्थापक अध्यक्ष सुमित चोरडिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान१३ सप्टेंबरला सर्वत्र गणरायाची स्थापना झाली. त्यासाठी शासकीय मैदानावर मोठ्या संख्येने मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. शुक्रवारी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली होती. मैदानावर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मैदानावर स्वच्छता अभिया राबविले. संपूर्ण मैदान स्वच्छ करून गोळा झालेला कचरा एका ठिकाणी एकत्र ठेऊन त्याचे दहन करण्यात आले.

टॅग्स :Dandiaदांडिया