शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोपालकृष्णच्या गजरात दुमदुमली फुलसावंगी

By admin | Updated: January 6, 2016 03:18 IST

हातात टाळ, कपाळावर अबीर बुक्का, रांगेत एका सुरात चालणारे भाविक आणि मुखात राधाकृष्ण, गोपालकृष्णच्या गजरात फुलसावंगीनगरी दुमदुमली.

अभंगाचे स्वर : श्रीमद् भागवत कथेचा समारोप, हरिनामाच्या गजरात गावकरी तल्लीन फुलसावंगी : हातात टाळ, कपाळावर अबीर बुक्का, रांगेत एका सुरात चालणारे भाविक आणि मुखात राधाकृष्ण, गोपालकृष्णच्या गजरात फुलसावंगीनगरी दुमदुमली. निमित्त होते, श्रीमद् संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ समारोपाचे. जणु फुलसावंगीला पंढरीचेच स्वरुप आले होते. गत सात दिवस फुलसावंगी येथे श्रीमद् संगीत भागवत कथा यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. गावात सकाळपासूनच अभंग आणि गौळणीचे स्वर निणादत होते. अशा या भागवत सप्ताहाचा समारोप सोमवारी झाला. समारोपीय कार्यक्रमाला गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. पंचारती घेऊन समाप्तीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीचे स्वागत करीत होते. या मिरवणुकीत नवारी नेसलेल्या मुली डोक्यावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी घेऊन सहभागी झाल्या होत्या. ‘वासुदेव आला, वासुदेव आला’ असे म्हणत पाच वासुदेव या मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महिला पाऊली खेळण्यामध्ये मग्न होत्या, नवयुवक व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराजांना खांद्यावर घेऊन हरिभजनाचा आनंद घेत होते. जणू फुलसावंगीला पंढरीचे स्वरूप आले होते. सकाळी ८ वाजतापासून पुण्यश्वर मंदिराच्या पायथ्यापासून सुरू झालेली ही मिरवणूक गावातून प्रदर्शन घालून पुन्हा भागवत ज्ञान मंडपात पोहोचली. त्याठिकाणी मधुकर खोडे महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. सात दिवस रामेश्वर महाराज खोडेंच्या अमृतवाणीतून भागवतकथेचा आनंद घेतला. महाप्रसादाने कथेचा समारोप झाला. या भागवत सप्ताहामुळे सात दिवस गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सकाळ, संध्याकाळ गावात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. (प्रतिनिधी)