शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चांगला वाचक चांगला लेखक होऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:16 IST

प्रतिभा सगळ्यांमध्ये असते पण, तिची वाढ करायला वातावरण व मार्गदर्शन हवे असते, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी केले.

ठळक मुद्देवसंत आबाजी डहाके : साहित्य व संस्कृती मंडळातर्फे नवलेखक कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रतिभा सगळ्यांमध्ये असते पण, तिची वाढ करायला वातावरण व मार्गदर्शन हवे असते, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने काव्य, कथा, नाट्य व वैचारिक लेखन नवलेखक कार्यशाळा येथे घेण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रा. विलास भवरे अध्यक्षस्थानी होते.डहाके पुढे म्हणाले, चांगला वाचक हा चांगला लेखक होऊ शकतो. लेखकाला जे लिहायचं आहे त्याचे संपूर्ण तपशील न्याहाळावे लागतील. निरिक्षण आणि अध्ययनातून तंत्र समजून घेऊन तंत्रकुशल लेखनाचा स्वीकार करून समाजाचं प्रामाणिकपणे चित्रण करावं लागेल. लोकांना आवडेल असं लेखन करणं अभ्यास, परिश्रम व प्रतिभाशक्तीशिवाय शक्य होणार नाही.नवलेखक कार्यशाळा तीन सत्रात पार पडली. उद्घाटन सत्राच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रथम सत्रात काव्य लेखनावर प्रा.डॉ. पी. विठ्ठल, तर कथात्म वाङ्मयावर डॉ. रवींद्र शोभणे यांनी विवेचन केले. द्वितीय सत्रात नाट्यलेखन कला व तंत्र यावर संजय जीवने यांनी प्रकाश टाकला, तर वैचारिक लेखनावर डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी विस्तृत माहिती दिली. समारोपीय सत्रात कादंबरीकार दिनकर दाभाडे यांनी आपले विचार मांडले. समारोपीय अध्यक्षीय भाषणात प्रा. विलास भवरे यांनी साहित्य प्रकारातील सर्व लेखनाचा मागोवा घेत आपले निरीक्षण मांडले.मारोती हनवते, अलफिया सैयद, नचिकेत धोटे, राहुल सोनोने, अ‍ॅड. संदीप गुजरकर व प्रगती मसराम या प्रवेशार्थिंनी आपला अभिप्राय या कार्यशाळेत व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा.डॉ. युवराज मानकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. संदीप नगराळे व सुनील भेले यांनी दिला. अकादमीचे सचिव आनंद गायकवाड यांनी भूमिका विशद केली. संचालन कवडू नगराळे व सुनील वासनिक यांनी, तर आभार डॉ. सुभाष जमधाडे यांनी मानले. यावेळी अकादमीचे डॉ. साहेबराव कदम, सुमेध ठमके, संजय ढोले आदी उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्य