शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅन्चो’ने भिंतीवरच साकारले होते ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST

फोटो फुलसावंगी : येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम ऊर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याने सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. ...

फोटो

फुलसावंगी : येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम ऊर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याने सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्याच हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याने टाकाऊ वस्तूंपासून टिकावू हेलिकॉप्टर बनविण्याचे धेय उराशी बाळगून घराच्या टिनांवरच हुबेहूब प्रतिकृती साकारली होती.

हेलिकॉप्टर बनविण्यासाठी लागणारे सुटे भाग व साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या डिस्पोजल (टाकाऊ किंवा भंगार) वस्तूंच्या दुकानातून खरेदी करून त्याने काम सुरू केले. मुख्य पात्याला लागणारी ॲल्युमिनियमची सीट हैदराबाद येथून आणली होती. मारोती ८००चे इंजिन डिस्पोजलमधून आणून वापरले. कोणीही आपल्या कलेची काॅपी करू नये म्हणून तो गावाच्या बाहेरील नातेवाइकांच्या लाकडाच्या दुकानात मुख्य पाते तयार करीत होता. मुख्य दोन पाते बनवण्यासाठी जवळपास एक महिना लागला. मेन रोटरला झेड सिस्टीम बनवायचे सर्व साहित्य हैदराबाद येथील बालनगरमधून आणले होते. मेन रोटर आणि टेल रोटर बनवायलाही एक महिना लागला होता.

केबिनला समोर लावली जाणारी फायबर ग्लास नांदेड येथून आणली होती. पात्याचा वेग मोजण्यासाठी लागणारे आरपीएम मीटर हैदराबादवरून आणले होते. रोटरला फिरविण्यासाठी हाउजिंग मारोती व्हॅनचे वापरले होते. केवळ टेल रोटरचा गिअर बाॅक्स कसा असतो, हे बघण्यासाठी तो हैदराबाद येथील बालनगर येथे गेला होता. नंतर तेथून आल्यानंतर त्याने हुबेहूब तसाच गिअर बाॅक्स स्वतः घरी बनवला. टेल रोटरला दिशा देण्यासाठी ॲप ऑटोचा क्लज इनर-आऊटर वापरला होता. या टाकाऊ वस्तूंची खरेदी करून वापरण्यासाठी त्याला जवळपास दीड ते दोन लाखांचा खर्च आला होता. दिवसाचे तीन तास मुन्ना हेलिकॉप्टर बनविण्याचे काम करीत होता. गेल्या तीन वर्षांत त्याने या प्रोजेक्टवर जवळपास १५५० ते १६०० तास काम केले, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र, मुन्नाचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने त्याला हिरावून नेले. ही हुरहूर सर्वांच्या मनात कायमची कोरली गेली.

बॉक्स

शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात चमक

शेख इस्माईल शेख इब्राहिम ऊर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याने शालेय जीवनात २००५ मध्ये पीठ गिरणी बनविली होती. शाळेत असताना विज्ञान प्रदर्शनात त्याने थ्री-ईन वन कुलर बनविला होता. ज्यात केवळ सात मिनिटात पिण्याचे पाणी थंड होऊन कुलर थंड हवा देत होता. भाजीपालाही थंड ठेवत होता. तत्पूर्वी त्याने सेलवर चालणारी बोअरिंग मशीन बनविली होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

बॉक्स

प्लास्टिकच्या हेलिकॉप्टरला बघून तयारी

मुन्नाने राहत्या घराच्या भिंतीवर दोन वर्षांपूर्वीच हेलिकॉप्टरची हुबेहूब प्रतिकृती (डिजाइन) काढली होती. त्यात ठिकठिकाणी वेगवेगळे मोजमाप टाकलेले दिसत आहे. त्याच्या दुकानात एक प्लास्टिकचे हेलिकॉप्टर ठेवलेले आहे. मुन्नाला काही अडचण आल्यास ते हेलिकॉप्टर बघून तो आपल्या कामात सुधारणा करीत होता.