लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या विस्तारासाठी प्रतिकूल परिस्थितीत झटणाºया स्वयंसेवकांचा कृतार्थ गौरव करण्यात आला. निमित्त होते, डॉ. अशोक गिरी यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ््याचे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ज्येष्ठ स्वयंसेवकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.आयोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री मदन येरावार यांच्या पुढाकाराने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात रविवारी हा सोहळा पार पडला. यावेळी संघ परिवारातील ज्येष्ठ डॉ. अशोक गिरी यांचा जीवनपट दाखविण्यात आला. त्यानंतर मंत्रीद्वयांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. यासोबतच डॉ. गिरी यांचे सहकारी असलेले वसंतराव गोखले, विठ्ठलभाई पटेल, रफिक रंगरेज (वणी), जाफर बॉम्बेवाला, वसंतराव फडणवीस, मधुकर गांधी, दादा भोगले (विडूळ) यांचाही कृतज्ञता सत्कार करण्यात आला.संघाच्या ‘राहु सुखे, पत्थर पायातील’ या प्रमाणे अनेकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून काम केले. आज त्यांच्याच परिश्रमामुळे आम्ही देशात, राज्यात मंत्री, खासदार आहोत, अशा भावना ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या. त्यांनी संघाच्या बांधणीच्या काळातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या यशामागे अनेकांचा त्याग असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी येथील आयुर्वेद महाविद्यालयासाठी एक कोटींचा निधी देण्याची घोषणाही केली. ना. हंसराज अहीर यांनीही ज्येष्ठाच्या परिश्रामचेच चिज असल्याचे सांगितले.यावेळी मंचावर सत्कारमूर्ती डॉ. अशोक गिरी, त्यांच्या पत्नी सुशीला यांच्यासह डॉ. सुरेंद्र पद्मावार, अर्बन बँकेचे अजय मुंधडा, सुरेश गोफणे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर उपस्थित होते. श्रोत्यांमध्ये आमदार संजवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह संघ परिवारातील अनेक गणमान्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री मदन येरावार, संचालन विवेक कवठेकर यांनी केले. यावेळी संघ परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.
संघासाठी झिजणाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:38 IST
जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या विस्तारासाठी प्रतिकूल परिस्थितीत झटणाºया स्वयंसेवकांचा कृतार्थ गौरव करण्यात आला. निमित्त होते, डॉ. अशोक गिरी यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ््याचे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ज्येष्ठ स्वयंसेवकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
संघासाठी झिजणाऱ्यांचा गौरव
ठळक मुद्देकृतज्ञता सोहळा : आयुर्वेद महाविद्यालयासाठी एक कोटी