शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचे एकमुश्त पॅकेज द्या

By admin | Updated: August 9, 2014 23:57 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांचे परिवार संकटात सापडले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने २५ हजार कोटी रुपयांची एकमुश्त मदत द्यावी,

विजय दर्डा : प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची आमसभा यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांचे परिवार संकटात सापडले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने २५ हजार कोटी रुपयांची एकमुश्त मदत द्यावी, या मागणीचा पुनरूच्चार लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी शनिवारी येथे केला. प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विजय दर्डा अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर आपण नेहमीच संसदेत सरकारचे लक्ष वेधतो. त्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न करतो. संसदेच्या चालू अधिवेशनात आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मागितले आहे. राज्यात आणि विशेषत: विदर्भातील शेतकरी, शेतमजूर विविध अडचणींचा सामना करीत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ या शेतकऱ्यांच्या जीवावर उठतो. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. हे सर्व प्रकार थांबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पॅकेज द्यावे, अशी मागणी आपण संसदेत केल्याचे विजय दर्डा यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी ही जागतिक मंदीची लाट आणि विपरित परिस्थितीतही प्रगती करीत आहे. चायना मार्केट कोसळल्याने सूताला उठाव नाही. सूत गिरण्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी शासनाकडे मदत, अनुदान मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सूत गिरणी उभी करण्यासाठी घेतलेले कर्ज वेगाने परतफेड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही ही सूत गिरणी नफ्यात आहे. सूत गिरणीचा निव्वळ नफा ३३ लाख ८५ हजार एवढा आहे. भागधारक, सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या एकजूट व परिश्रमामुळेच सूत गिरणी प्रगतीपथावर असून ती आणखी शिखर गाठेल, असा विश्वास विजय दर्डा यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने सूत गिरणीच्या सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे, संस्थेचे सभासद स्वातंत्र्य सैनिक ब्रम्हप्रसाद उपाख्य बी.जी. यादव आदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत गिरणीचे उपाध्यक्ष माजी आमदार कीर्ती गांधी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात सूत गिरणीचा एकूणच लेखाजोगा मांडला. चालू वर्षात प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी एकूण २८ हजार ७०४ चात्यांवर सूताचे उत्पादन करीत असल्याचे कीर्ती गांधी यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर यांनी केले. या सर्वसाधारण सभेला सूत गिरणीचे संचालक किशोर दर्डा, डॉ. अनिल पालतेवार, डॉ. जाफरअली अकबरअली जीवाणी, सुधाकर बेलोरकर, प्रकाशचंद छाजेड, संतोषकुमार भूत, राजीव निलावार, संजय पांडे, अनिल मांगुळकर, जयानंद खडसे, कैलास सुलभेवार, डॉ. प्रताप तारक, लिलाबाई बोथरा, उज्वला अटल, महाव्यवस्थापक डॉ. सी.जेय रघुरामन आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)