शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

मुलींची बाजी : प्रिया बोबडे तालुक्यातून पहिली, गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:20 IST

बारावीच्या परिक्षेचा तालुक्याचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. या निकालात विद्यार्थीनींनी बाजी मारली. तालुक्यातून पहिली येण्याचा मान मालखेड येथील प्रिया यादव बोबडे हिने पटकाविला. तिने ९०.१५ टक्के गुण घेतले. ती दी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. याच विद्यालयातील कला शाखेची विद्यार्थीनी आशा परवीन सलीम शहा ही ९० टक्के गुण घेत द्वितीय स्थानी राहिली. राणी रमेश इंगळे ही वाणिज्य शाखेत ८७.३८ टक्के गुण घेत तिसरी आली.

ठळक मुद्देनेर तालुक्याचा निकाल ८८.६३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : बारावीच्या परिक्षेचा तालुक्याचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. या निकालात विद्यार्थीनींनी बाजी मारली. तालुक्यातून पहिली येण्याचा मान मालखेड येथील प्रिया यादव बोबडे हिने पटकाविला. तिने ९०.१५ टक्के गुण घेतले. ती दी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. याच विद्यालयातील कला शाखेची विद्यार्थीनी आशा परवीन सलीम शहा ही ९० टक्के गुण घेत द्वितीय स्थानी राहिली. राणी रमेश इंगळे ही वाणिज्य शाखेत ८७.३८ टक्के गुण घेत तिसरी आली.नेर तालुक्यातून १२६७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यातील ११२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.६५ तर मुलींची ९२.४४ आहे. दी इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९७ टक्के लागला. बाणगाव येथील रमाई आश्रम शाळेने ९५ टक्के निकाल दिला आहे. चिकणी येथील अनुसया भोयर कला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९३ टक्के लागला. रामदास आठवले कला-विज्ञान महाविद्यालय ९२ टक्के, अंबिका हायस्कूल मांगलादेवी ८५ टक्के, सावित्रीबाई फुले महाविद्यालय नेर ९० टक्के, हरिकमल हायस्कूल खरडगाव ७७ टक्के, वसंतराव नाईक महाविद्यालय कोव्हळा ७३ टक्के, हाजी सत्तार विज्ञान महाविद्यालय नेर ८५ टक्के, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला महाविद्यालय वटफळी ७२ टक्के, नेहरू महाविद्यालय ८४ टक्के तर माणिकवाडा येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालयाचा निकाल ८४ टक्के लागला आहे.दी इंग्लिश हायस्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य उदय कानतोडे, उपप्राचार्य के.पी. देशमुख, प्रा.किशोर राठोड, प्रा. अरूण नरवडे, प्रा.सुनिल गावंडे, प्रा.अनंत हिरूळकर, प्रा. प्रवीण मिसाळ, प्रा. प्रशांत बुंदे आदींनी सत्कार करून कौतुक केले.प्रियाचे शिकवणीशिवाय यशनेर तालुक्यातून पहिली आलेली प्रिया यादव बोबडे हिने कुठल्याही विषयाची शिकवणी न लावता यश मिळविले आहे. तिचे वडील दुधविक्रेते तर आई गृहिणी आहे. स्पर्धा परिक्षेची तयार करून अधिकारी होण्याची मनीषा तिने व्यक्त केली. या दृष्टीने आवश्यक तयारी करणार असल्याची ती म्हणाली.