शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

मुलीला देहविक्री व्यवसायात लोटण्याचा डाव उधळला

By admin | Updated: July 29, 2015 02:25 IST

किशोरवयीन मुलीच्या अल्लडपणाचा फायदा घेऊन तिला विकण्याच्या प्रयत्न यवतमाळ शहर पोलिसांच्या सतर्कतेने उधळला गेला.

शहर पोलिसांची सतर्कता : नागपूरला नेण्याची होती तयारी, महिला पसार सुरेंद्र राऊत यवतमाळकिशोरवयीन मुलीच्या अल्लडपणाचा फायदा घेऊन तिला विकण्याच्या प्रयत्न यवतमाळ शहर पोलिसांच्या सतर्कतेने उधळला गेला. यवतमाळ बसस्थानकावरून सदर मुलीला नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला देहविक्री व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांना आहे. लगतच्या मासोळी येथील नवव्या वर्गातील मुलगी १० जुलै रोजी बाहेर गेली. मात्र रात्र झाली तरी ती घरी परतली नाही. म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेतला. थांगपत्ता लागत नसल्याने अखेर ११ जुलै रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीला फुस लावून दारव्हा येथील एका तरुणाने पळविल्याचे या तक्रारीत म्हटले होते. त्यावरून पोलिसांना सदर तरुणाला दारव्हा येथून ताब्यात घेतले. प्रत्यक्षात सदर मुलगी त्याच्याकडे गेलीच नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी तपास सुरू केला. त्यावेळी तिच्या मोबाईलवरून प्रियकाराला येणाऱ्या फोनचा माग घेतला असता ती येथे बसस्थानक परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले.सदर मुलगी दारव्हा येथे जाण्यासाठी यवतमाळ बस्थानकावर आली होती. त्यावेळी तिची ओळख एका महिलेशी झाली. तिला भावनीक साद घालून बसस्थानक परिसरालगतच्या एका रुमवर नेले गेले. तेथे तिला तब्बल सहा दिवस ठेवले. या काळात प्रियकर आणि आईवडीलांबाबत तिच्या मनात संशय निर्माण करण्यात आला. त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी महिलेच्या सांगण्यावरून आईवडीलांना फोन करून खोटी माहिती देत होती. प्रियकरालाही सतत फोनवरून भेटायला ये, असे सांगत होती. प्रत्यक्षात मात्र भेटायला जात नव्हती. ही मुलगी त्या महिलेसोबत नागपूर येथे जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी तिच्या वडीलांना घेऊन १६ जुलै रोजी सकाळी सापळा रचला व तिला ताब्यात घेतले. ती महिला मात्र पसार झाली. तिला बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यवतमाळातूनही मानवी तस्करीचा संशय मानवी तस्करी काय असते, हे मुलीला समजावून सांगण्यात आले. आईवडिलावर कोणताही रोष नसता केवळ दुर्लक्षामुळे घराबाहेर पडलेली मुलगी कुुटंणखाण्यात जाण्यापासून बचावली. ही कारावाई पोलीस उपनिरीक्षक हितेश राऊत व त्यांच्या पथकाने केली. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. नागपूरात पोलिसांनी लावलेला सापळा एकदा अपयशी झाला आहे. यवतमाळातूनही मानवी तस्करी होत असल्याची दाट शक्यता या घटनेमुळे वर्तविली जात आहे. तसेच भरकटलेल्या मुलींना वेश्या व्यवसायत ओढणारे रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.