शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला पळविले; तीन वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: June 24, 2017 00:51 IST

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी आरोपी आशिष गोपाल वानखेडे (२१) रा. लोहारी सावंगा, ता. नरखेड जि. नागपूर

जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी आरोपी आशिष गोपाल वानखेडे (२१) रा. लोहारी सावंगा, ता. नरखेड जि. नागपूर याला कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व ३०० दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसाचा कारावास, तसेच कलम १२ बाललंैगिक अत्याचार कयद्यांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व २०० दंड आणि दंड न भरल्यास १० दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील अति. सत्र न्यायाधिश शेंडे यांनी शुक्रवारी दिला. घटनेची थोडक्यात हकीेकत अशी की, २२ आॅगस्ट २०१४ रोजी पीडित ही शासकीय आदिवासी वसतीगृहात मैत्रीन व बहिणीसोबत जात असताना आशिष वानखेडे याने तिला आर्वी बसस्थानकावरून फुस लावून पळून नेले. यावेळी आरोपीने त्याचे नाव अजय उईके असे असल्याचे सांगितले. मात्र त्याचे खरे नाव आशिष वानखेडे असे असल्याचे तपासात समोर आले. आशिष याने पीडितेला विविध ठिकाणी नेत नेले. दरम्यान ४ सप्टेंबर २०१४ रोजी या दोघांना खरांगणा पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहा. शासकीय अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी शासनातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून मनिष श्रीवास, यांनी साक्षदारांना हजर करून सहकार्य केले. तपासी अधिकारी म्हणून प्रशांत पांडे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे साक्षीपुरावा व युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. दोन्ही कलमांतर्गत असलेल्या शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.