शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घुई-बोरगाव रस्ता आठवड्यापासून बंद

By admin | Updated: July 15, 2016 02:38 IST

यवतमाळ ते नेर राज्य मार्गावर लासीना ते घुई-बोरगाव या रस्त्यावरील पुलाचे बाधंकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहे.

विद्यार्थी त्रस्त : पुलाचे काम अर्धवट, वळणरस्ता गेला वाहून सोनखास : यवतमाळ ते नेर राज्य मार्गावर लासीना ते घुई-बोरगाव या रस्त्यावरील पुलाचे बाधंकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. शिवाय वळण रस्ताही पूर्णपणे वाहून गेल्यामुळे गेल्या सात दिवसापासून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या मार्गावरील एसटी बस किंवा खासगी वाहनेही आठवडाभरापासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा फेरा मारून कामठवाडा-सारंगपूर मार्गे जावे लागत आहे. सात दिवसांपासून संततधार पावसामुळे पुलाचे काम ठप्प पडले आहे. वाहतुकीसाठी पुलाच्या बाजूने केलेला वळण रस्ताही पुरामुळे पूर्णत: वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरून वाहतुकीसाठी संधीच उरलेली नाही. यवतमाळ, लासीना येथे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नाईलाजाने दहा किलोमीटर पायदळ जावे लागत आहे. यवतमाळ, घुई, बोरगाव, लाडखेड ही एसटी बसही सात दिवसांपासून बंद आहे. बोरगाव(लिंगा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे ये-जा करणाऱ्या रुग्णांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत वाहून गेलेला वळण रस्ता तरी नीट करावा, अशी मागणी घुई-बोरगाव येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)