शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

किसान सन्मानधनाच्या पोर्टलवर घाटी शिवार बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:27 IST

१९८ शेतकरी वंचित : घाटंजी तहसीलवर संतप्त शेतकऱ्यांची धडक (फोटो) घाटंजी : शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री ...

१९८ शेतकरी वंचित : घाटंजी तहसीलवर संतप्त शेतकऱ्यांची धडक

(फोटो)

घाटंजी : शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री सन्मानधन योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या पोर्टलवर घाटंजी तालुक्यातील घाटी शिवाराची नोंदच नाही. त्यामुळे तब्बल १९८ शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून मदतीला मुकले आहेत. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन प्रशासनावर रोष व्यक्त केला.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना २०१९ मध्ये लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत देण्यात येते. मात्र या लाभापासून घाटी शिवारातील १९८ शेतकरी वंचित असून, घाटी हे नाव या योजनेच्या पोर्टलवरच नाही. त्यामुळे तेथील सर्व शेतकरी वंचित आहेत. मात्र इतरही योजनांपासून वंचित आहेत.

पोर्टलवर नाव येण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली; मात्र कार्यवाही झाली नाही. उलट कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांचा या योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्यामुळे सत्कार केला गेला. परंतु, वंचित शेतकऱ्यांचे काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी केला. घाटी येथील शेतकरी सर्व योजनांपासून वंचित राहात आहेत. घाटीचे नाव लवकरात लवकर पोर्टलवर उपलब्ध व्हायला हवे व सर्व प्रलंबित शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे २०१९ पासून आतापर्यंत पैसे व इतर सर्व नुकसानभरपाई करून द्यावी अन्यथा आंदोलनासाठी तयार रहावे, असा इशारा महेश पवार यांनी दिला. यावेळी शेतकरी राजेश जाधव, केशव बोंद्रे, पांडुरंग भोयर, कृष्णराव सिंगेवार, नामदेव निमनकार, संजय बोंद्रे, अवधूत चौरागडे, विकास फुसे, लक्ष्मण गिरी, अरविंद गोरे, नागोराव सावसाकडे, जाफर इमाम खा पठाण, राजेश ठाकरे, संजय सावसाकडे, गोविंदा साखरकर, माया मंगाम, सुमन कनाके, मधुकर पेटेवार, जुबेर मिया देशमुख, शेखचंद कुरेशी, वासुदेव सिडाम, विष्णू शिंदे, मारुती नखाते, विठ्ठल शेंद्रे, दादाराव उदार, नीलेश भूत उपस्थित होते.

कोट

एका वर्षापूर्वी निवेदन देऊनसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. जेव्हापासून योजना डिजिटल झाल्या आहेत. तेव्हापासून जास्तीत जास्त वेळेस आम्ही वंचितच राहिलो. कारण पोर्टलवर घाटी नावच नाही. किसान सन्मान निधीपासून मदत मिळेल, अशी अपेक्षा केली. मात्र तिथेसुद्धा काहीच नाही.

- राजेश जाधव, वंचित शेतकरी, घाटी