शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत जप्ती कारवाई तीव्र

By admin | Updated: February 22, 2017 01:25 IST

थकीत मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम नगरपरिषदेने तीव्र केली आहे. प्रमाणापेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या प्रतिष्ठानांवर जप्ती आणली जात आहे.

थकीत करवसुली : जिनिंगने भरली ११ लाखांची रक्कम घाटंजी : थकीत मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम नगरपरिषदेने तीव्र केली आहे. प्रमाणापेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या प्रतिष्ठानांवर जप्ती आणली जात आहे. त्यामुळे कराचा भरणा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील एका जिनिंगवर जप्तीची कारवाई केली होती. या प्रतिष्ठानाने करापोटी ११ लाखांची थकीत रक्कम धनादेशाद्वारे नगरपरिषदेकडे जमा केली आहे. लाखो रुपयांच्या थकीत कर वसुलीसाठी वारंवार सूचना देवूनही भरणा केला जात नसल्याने नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. या अंतर्गत येथील दोन जिनिंगवर भूखंड जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्या जिनिंगमध्ये आंबेडकर वॉर्डातील बिर्ला कॉटसिन इंडिया लि. आणि दुर्गा माता वॉर्डातील राणा कॉटन या दोन जिनिंगचा समावेश होता. यापैकी कॉटसिन इंडिया लि.चे सहायक जनरल मॅनेजर (पर्सनल) व सुपरवायझर नागेश्वर दामोदर जिड्डेवार यांनी थकीत करापोटीचा ११ लाख दोन हजार ७९० रुपयांचा धनादेश नगराध्यक्ष नयना ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी नगरपरिषदेचे कर निरीक्षक भगवान बन्सोड, लेखापाल र.द. दिकुंडवार, लिपिक गजानन बुक्कावार, पाणीपुरवठा विभागाचे धीरज जाधव आदी उपस्थित होते. मालमत्ता जप्तीच्या धडक कारवाईने मात्र अनेक थकीत करदाते कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहित झाले आहे. दुसरे राणा कॉटनकडे पाच लाख १८ हजार ६३८ रुपये थकीत आहे. ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)