ऑनलाईन लोकमतघाटंजी : शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवण्यासाठी येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी हाक दिली अन् त्या हाकेला प्रतिसाद मिळून लोक हातात फावडे, टोपले घेऊन गल्लीबोळात रस्त्यावर, वार्डावार्डात जेथे कचरा दिसेल, तेथे पोहोचून सकाळचा आपला एक तासाचा वेळ देऊन श्रमदान करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नित्यश्रम सुरू आहे. हे पाहून स्वच्छता अभियान घाटंजीत लोकचळवळ बनली आहे.या स्वच्छता अभियानात नगरसेवक, नागरिक, समर्थ विद्यालय, समर्थ कर्णबधिर शाळा, एसपीएम विद्यालय, नगरपालिका शाळा, त्यांचे शिक्षक, विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणे शहर स्वच्छ होत आहे. नालीतील साचलेला गाळ, घाण काढल्याने संबंधित परिसर दुर्गंधीमुक्त होत आहे. ही लोकचळवळीची ताकद आहे. श्रमदानाची किमया आहे. हे सर्व पाहून नगराध्यक्ष नयना ठाकूर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, मुख्याधिकारी महेश वाघमोडे भारावून गेले आहे.पहिल्या टप्प्यात गाव स्वच्छ करणे, दुसऱ्या टप्प्यात मोकळ्या जागेचा वापर मुलांना खेळण्यासाठी, झाडे लावण्यासाठी, तिसऱ्या टप्प्यात पाणी संवर्धनाची कामे सर्वांच्या सहकार्याने करणे आदी बाबीचे नियोजन आहे. यामुळे शहराचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर रूप प्राप्त होण्याची शक्यता आहे. नागरिक, पालिका पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, वन विभाग या चळवळीत हिरीरीने सहभागी होत आहे.
घाटंजीत स्वच्छता अभियान बनले चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:38 IST
शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवण्यासाठी येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी हाक दिली अन् त्या हाकेला प्रतिसाद मिळून लोक हातात फावडे, टोपले घेऊन गल्लीबोळात रस्त्यावर, ......
घाटंजीत स्वच्छता अभियान बनले चळवळ
ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद : नागरिक, विद्यार्थ्यांचे दररोज श्रमदान, शहर सुंदर बनविण्याचा संकल्प